अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा; काँग्रेस मंत्र्यांच्या अजब सल्ल्यानं सगळेच चक्रावले

अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा; काँग्रेस मंत्र्यांच्या अजब सल्ल्यानं सगळेच चक्रावले

भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात.

  • Share this:

सोलापूर, 9 ऑगस्ट: प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील आणि तुमचं कामं होतं नसतील तर दंगा करा' असा अजब सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जा, असा अजब सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मंत्री महोदयांना आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिल्यानं सगळेच चक्रावले आहेत. मात्र, बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत आपापल्या वक्तव्यावरून सारवासारव केली.

हेही वाचा... शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस आमदारानं हटवला, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी शनिवारी बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर आल्या होत्या. त्याआधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री महोदयांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर ते कामे होत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलं.

कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळायला हवा. त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करु, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. तर अधिकाऱ्यांवर आपला धाक असायला हवा. धाक निर्माण करण्याची गरज जनतेची, कार्यकर्त्याची असली पाहिजे. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीनं गेलं पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं' असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.

हेही वाचा...पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी, मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू

मात्र, नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केली. काम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असायला हवा, अशा अर्थाने आपण वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दरम्यान, ग्रामीण भागात मृत्यूदर वाढू देवू नका; अशा सूचना बाळासाहेब थोरात यांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर राजकीय कोरोनाला घाबरु नका; स्वतःच्या पायावर उभे रहा, असंही आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं.

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या