Home /News /maharashtra /

Thane: रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Thane: रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Minor Girl Rape in Thane: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय रिक्षाचालकानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

    कल्याण, 05 मार्च: ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय रिक्षाचालकानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl raped by rickshaw driver) केला आहे. मागील सहा महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. गुन्हा दाखल होताच विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दीपक हिवाळे असं अटक केलेल्या 35 वर्षीय नराधम आरोपीचं नाव असून तो रिक्षाचालक आहे. आरोपी हिवाळे यांनं काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवली होती. त्यानंतर आरोपीनं तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. हेही वाचा-10 वर्षांचं प्रेम, लग्न मात्र 10 महिनेच टिकलं; दुसऱ्या लग्नासाठी घेतला घटस्फोट मागील सहा महिन्यांपासून आरोपी रिक्षाचालक पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार समजताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंना लुटलं; सांगलीत वृद्धासोबत घडला धक्कादायक प्रकार अल्पवयीन मुलीचा नग्न VIDEO सोशल मीडियात VIRAL दुसऱ्या एका घटनेत, पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) येथील एका 22 वर्षीय तरुणानं पोलीस असल्याची बतावणी करत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ (Minor girl obscene video) पाठवण्यास भाग पाडलं आहे. आरोपीनं पीडित मुलीच्या बहिणीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देत पीडितेला हे कृत्य करण्यास भाग पाडलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) केले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape on minor, Thane

    पुढील बातम्या