मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रिक्षाचा धक्का लागला म्हणून दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाची केली हत्या

रिक्षाचा धक्का लागला म्हणून दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाची केली हत्या

प्रदीप भणगे, डोंबिवली, 10 आॅक्टोबर : यू टर्न मारत असताना रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने वाद होऊन रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीत घडलाय. डोंबिवलीच्या टंडन रोड परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विजय लष्कर असं मृताचं नाव असून तो आज दुपारी त्याचा भाऊ अजय लष्कर याच्यासह टंडन रोडवरून घरी जेवायला निघाला होता. यावेळी टंडन रोडवर यू टर्न मारताना अचानक एक दुचाकी त्यांच्या रिक्षावर येऊन धडकली. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली आणि दुचाकीस्वार नितीन केणे याने विजय याच्या छातीत ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. हे घाव वर्मी बसल्यानं विजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक नितीन केणे याला अटक केलीये. त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी मृत विजयच्या नातेवाईकांनी केलीये. ========================
First published:

Tags: Dombivli, Dombivli news, डोंबिवली

पुढील बातम्या