मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तांदूळ खेचणारा 1 हजार कोटींचा धातू, मुंबई पोलिसांनी समोर आणला धक्कादायक प्रकार

तांदूळ खेचणारा 1 हजार कोटींचा धातू, मुंबई पोलिसांनी समोर आणला धक्कादायक प्रकार

राईस पुलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले अन्यथा या व्यापाऱ्यासह मुंबईतील अनेक धनाढ्य व्यापारी देशोधडीला लागले असते.

राईस पुलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले अन्यथा या व्यापाऱ्यासह मुंबईतील अनेक धनाढ्य व्यापारी देशोधडीला लागले असते.

राईस पुलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले अन्यथा या व्यापाऱ्यासह मुंबईतील अनेक धनाढ्य व्यापारी देशोधडीला लागले असते.

ठाणे, 25 फेब्रुवारी : राईस पुलरच्या नावाखाली मुंबईच्या मालाड येथे एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुंबई पोलिसांनी वेळीच छापा टाकून राईस पुलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले अन्यथा या व्यापाऱ्यासह मुंबईतील अनेक धनाढ्य

व्यापारी देशोधडीला लागले असते.

युट्यूबवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओ प्रमाणेच अँटी रेडीएशन सूट घालून प्रात्यक्षिक देवून आमच्याकडे असलेली अँटिक वस्तू ही कॉपर इरेडियमने बनवण्यात आलीये. त्या वस्तूचे परीक्षण करुन त्यातून कॉपर इरेडियम वेगळा करायचाय... त्याकरता १०-१५ कोटी रुपयांची गरज आहे असं सांगून प्रात्यक्षिक दाखवून मुंबईतील मालाड परीसरातील एका व्यापाऱ्याला 25 लाखांचा गंडा घातला गेला.

अशी झाली फसवणूक

tinus international AntiQue And metals pvt ltd या बनावट कंपनीच्या नाव सांगून आम्ही मोठे संधोधक आहोत आम्ही खुप मोठं संशोधन केलंय. अंतराळात पाठवण्यात येणारे रॉकेट बनविण्याकरता वापरण्यात येणारा धातू कॉपर इरेडियम हा अति प्राचीन, दुर्मिळ आणि महागडा आहे. या धातूची जागतिक बाजारपेठेत हजारो कोटी रुपये किंमत आहे. काही कोटी रुपये गुंतवा आणि आमच्या कंपनीचे भागीदार व्हा... परीक्षण करुन कॉपर इरेडियम विकून हजारो कोटी रुपये येतील त्यात तुमचा हजारो कोटी रुपयांचा हिस्सा असेल असं भासवून ही फसवणूक करण्यात आली.

मुंबई पोलीस क्राईम ब्रांच युनिट ११ कडे या राईस पूलर प्रकाराबाबत तक्रारार येताच त्यांनी वेळ न दवडता तात्काळ मालाड येथील एरंगळ गावात छापा टाकला. सोबितकुमार दास, मनीष मित्तल, संजय चौधरी, उत्तम माधावी, निजारअहमद रहमान, सुधीर ठाकूर, निलेश सदानंद दळवी या आरोपींच्या मुसक्या आवळत या टोळीसह इलेक्ट्रॉनिक इक्युपमेंट tinus international AntiQue And metals pvt ltd  या कंपनीची कागदपत्रे,  डिएशन सूट, विशिष्ठ प्रक्रिया केलेले तांदुळासह इतर साहित्य हस्तगत केलंय.

मुंबईत राईस पुलर प्रकरणी फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या ३ महिन्यात मुंबई क्राईम ब्रांचने ५ बोगस कंपन्यांचा नावाखाली राईस पुलर करुन तब्बल ८ कोटी रुपये फसवणूक झाल्याचं गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूस असा राईस पुलरचा प्रकार घडत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांनी द्या.

 काय आहे राईस पुलर ?

कॉपर इरेडियम हा अति प्राचीन, दुर्मिळ आणि अत्यंत महागडा धातू आहे. पूर्वीच्या काळात ज्या वस्तू बनवल्या जायच्या त्या जास्त काळ टिकाव्या आणि कोणत्याही वातावरणात टिकाव्या याकरता त्या वस्तू कॉपर इरेडियम ने बनवल्या जायच्या. जगात कॉपर इरेडियमने बनवलेल्या अँटिक वस्तू खुप दुर्मिळ आहेत. कालातरांने अंतराळात पाठवण्यात येणारे रॉकेट बनवण्याकरिता हलका, कठीण, टणक, कोणत्याही वातावरणात टिकेल अशा धातूची गरज भासली कॉपर इरेडियम या धातूला हजारो अंश सेल्सियस तापमानात देखील काही होत नाही. हे संशोधकांच्या लक्षात आल्यावर या धातूची किंमत जागतिक बाजारात कोट्यवधी रुपये झाली. कॉपर इरेडियम ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे जसं लोखंड चुंबकाकडे खेचले जातं तसंच या धातूकडे तांदळाचे दाणे खेचले जातात.

जर कॉपर इरेडियम असलेली वस्तू पासून १ सेंटीमिटर अंतरावरुन तांदळाचे दाणे खेचले गेले तर त्या धातूच्या एका तुकड्याची किंमत १ ते ५ हजार कोटी रुपये असते तसंच कॉपर इरेडियमने जास्त लांबून म्हणजे १ इंचापेक्षा जास्त अंतरावरुन तांदळाचे दाणे खेचले तर तो इरेडियम जास्त पावरफुल समजला जातो. त्यामुळे त्या इरेडियमच्या तुकड्याची किंमत २१ हजार कोटी रुपये असते. कॉपर इरेडियममध्ये अल्फा बिटा, गॉमा सारखी किरणे उत्सर्जित व आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात त्याचे परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केले जाऊ शकते. याकरता डीआरडीओ,  संरक्षा मंत्रालयाची आणि बीएआरसीची मान्यता असणे आवश्यक असते.

पण, विशिष्ट प्रक्रिया केलेले तांदूळ रेडिएशन सूट घालून फिल्मी स्टाईलने प्रात्यक्षिक देवून आपल्याकडे डीआरडीओ आणि रक्षा मंत्रालयाची परवानगी आहे, असं भासवून कॉपर इरेडियमचा १ टक्के अंश देखील नसलेल्या वस्तूने तांदळाचे दाणे खेचताना दाखवले जातात. त्यानंतर आता या वस्तूचे परीक्षण करुन कॉपर इरेडियम वेगळे करायचे आहे. त्याकरता परिक्षण करणे गरजेचे आहे. या परिक्षणा करता काही कोटी रुपये गुंतवून आमच्या कंपनीचे भागीदार व्हा अशी ही टोळी ग्राहकाला सांगायची. कॉपर इरेडियम वेगळे करुन तो धातू विकून जे हजारो कोटी रुपये येतील. त्यातून काही हजार कोटी रुपये तुमचा हिस्सा असेल असं ही टोळीला ग्राहकांना आमिष दाखवायची ज्या पायी ग्राहक कोटी कोटी रुपये या भामट्यांना द्यायचे आणि स्वत:ची फसवणूक करुन घ्यायचे.

First published: