'या' आठवड्यात होणार परतीच्या पावसाला सुरुवात, तोपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार

'या' आठवड्यात होणार परतीच्या पावसाला सुरुवात, तोपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार

खरंतर परतीच्या पावसाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होते. पण यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊसही लांबणीवर गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : यंदाचा मान्सून उशिरा दाखल झाला तसंच आता त्याच्या परतीलाही उशिर होणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. पुढील काही दिवसांत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परतीच्या पावसापर्यंत सगळ्याच राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

खरंतर परतीच्या पावसाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होते. पण यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊसही लांबणीवर गेला आहे. हवामानातील बदलामुळे पुढच्या काही दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा या भागांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 15वर गेला आहे. शहरात चिखलाचं साम्राज्य माजलं आहे. अनेक ठिकाणी गाळ अडकला आहे. काही इमारतींमध्ये पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. जोरदार पावसाचा फटका महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसल्याने पद्मावती येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसलं. दांडेकर पुलालगतची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहराच्या बऱ्याच भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे आज नवी पेठ, राजेंद्रनगर, डेक्कन, पुलाची वाडी, प्रभात रस्ता परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

इतर बातम्या - एकाला वाचवायला गेले आणि नदीच्या प्रवाहात दोन जण बुडाले

तर तिकडे हवामान विभागानं पालिकेच्या आपत्कालीन कक्षावर खापर फोडलं आहे. रात्रभर पुण्यात पूरस्थिती असताना आपत्कालीन कक्षात मात्र फक्त 8 ते 9 फोन आल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील बिबवेवाडी येथील संगम सोसायटीत पाणी घुसल्यानं खूप नुकसान झालं. तसंच अंबिल ओढ्यालाही पाणी आल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.

कर्हा नदीच्या पुरामुळं बारामतीचं मोठं नुकसान झालं आहे. पुराच्या पाण्यामुळे घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीचं नुकसान झाल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. गोदावरीला पूर आल्याने बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या राक्षस भुवनचं शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिर पाण्यात गेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कारण पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर जायकवाडीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नाथसागरचेही 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे कर्हा नदीच्या लगतची सर्व गावं आणि बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात येतो आहे. पुरंदर तालुक्यातील कर्हा नदीला पूर आला आहे. या पुरात कुंभारवळण आणि खळद गावाचं मोठं नुकसान झालं. गावातील 4 घरे आणि 6 जनावरे पुरात वाहून गेली आहेत.

SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

First published: September 27, 2019, 7:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या