लातूरमध्ये चोरांनी फोडली निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कार, 20 हजारांवर मारला डल्ला!

लातूरमध्ये चोरांनी फोडली निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कार, 20 हजारांवर मारला डल्ला!

चोरांनी पैेसे नाहीतर सोबत गाडीत असलेली कागदपत्रे आणि चेकबूक सुद्धा गायब केले होते.

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 20 नोव्हेंबर : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या गाडीची काच फोडून 15 ते 20 हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना लातूर शहरात घडली आहे. एवढंच नाहीतर चोरांनी चेकबूकही पळवून नेला होता.

लातूर शहरात निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव हे एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आले होते. हा लग्न सोहळा औसा बार्शी रिंगरोडवरील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

मंगल कार्यालयाबाहेर त्यांनी आपली कार उभी केली होती. त्यावेळी चोरट्याने त्याच्या खाजगी कारच्या काच फोडली आणि १५ ते २० हजाराची रक्कम लंपास केली. सोबतच गाडीत असलेली कागदपत्रे आणि चेकबूक सुद्धा चोरून नेले. पण चेकबूकचा उपयोग होणार नसल्याने जवळील नाल्यात चेकबुक आणि अन्य कागदपत्रं फेकून दिली.

या घटनेनंतर लातूर पोलीस घटनास्थळी धाव घेतली.

याबाबतीत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्यापही पोलिसांना धागेदोरे हाती लागले नाहीत.

मात्र, एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेवर डल्ला मारल्याने लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खाजगी कारमध्ये पोलीस दलाचा अंबर दिवा सापडला आहे. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पोलीस खात्याचा अंबर दिवा वापरता येत नाही यावर काय कारवाई पोलीस करणार याकडे लक्ष लागून आहे.

====================

Published by: sachin Salve
First published: November 20, 2019, 11:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading