Home /News /maharashtra /

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी मुलासह आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी मुलासह आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे.

    सांगली, 23 जानेवारी :  सांगली (sangali) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे निवृत्त पोलीस हवालदाराने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी गावात ही दुःखद घटना घडली. अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा महेश गव्हाणे याला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यामुळे कर्जबाजारीतून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. महेश याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्याने यासाठी सावकराकडून कर्ज घेतले होते. परंतु, महेशकडून पैसे देण्यात येत नसल्यामुळे सावकराने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस त्याला अटक करणार होते, परंतु, त्याआधीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. महेशने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर आत्महत्येबद्दल एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये सावकराचा उल्लेख केला होता. मात्र, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तर आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असून गव्हाणे यांच्या घराजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या