Home /News /maharashtra /

राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण (Neela Satyanarayan) यांचे कोव्हिड19 (COVID-19) मुळे निधन झाले आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

    मुंबई, 16 जुलै : कोरोनाचा विळखा देशभरात वाढू लागला आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकानी प्राण गमावले आहेत. दरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण (Neela Satyanarayan) यांचे कोव्हिड19 (COVID-19) मुळे निधन झाले आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात त्यांना या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे सत्यनारायण यांचे निधन झाले. मंत्रालयात त्यांनी वेगवेगळ्या पदावर सचिव म्हणून काम केले आहे. त्या महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव देखील होत्या. त्यांच्याकडे काही काळासाठी राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी देखील होती. 2009मध्ये त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त (First Woman State Election Commissioner) होण्याचा बहुमान मिळाला होता. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नीला सत्यनारायण या 1972 च्या सनदी अधिकारी होत्या. एक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं काम वाखाणण्याजोगे होते. 05 जुलै 2014 रोजी त्यांनी निवृत्ती स्विकारली. राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. त्या उत्तम कवयित्री होत्या, तसंच साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. यांसारख्या अनेक आठवणींना राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी उजाळा दिला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या