निवृत्त जवानाची घोड्यावर मिरवणूक..आतषबाजी करत केले जंगी स्वागत

निवृत्त जवानाची घोड्यावर मिरवणूक..आतषबाजी करत केले जंगी स्वागत

रुबाबात घोड्यावर स्वार झालेला लष्करातील जवान.. दिमतीला बँड बाजा आणि ताल धरणारी लेझीम पथकातील मुले..आणि त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेलं संपूर्ण गाव...ही मिरवणूक काही प्रचाराची नाही किंवा..काय असेल बरं असा प्रश्नच साहजिकच निर्माण होईल..

  • Share this:

बीड, 4 मे- रुबाबात घोड्यावर स्वार झालेला लष्करातील जवान.. दिमतीला बँड बाजा आणि ताल धरणारी लेझीम पथकातील मुले..आणि त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेलं संपूर्ण गाव...ही मिरवणूक काही प्रचाराची नाही किंवा..काय असेल बरं असा प्रश्नच साहजिकच निर्माण होईल.. परंतु कारण होतं खास.. गावातील भूमिपूत्र ज्यानं देशाची तब्बल 17 वर्षे डोळ्यात तेल घालून रक्षण केलं. त्या जवानांच्या निवृत्तीनंतर निधड्या छातीच्या स्वाभिमानी जवानांची गावातील लोकांनी टोलेजंग मिरवणूक काढली.

बीडच्या शिरूर कासार येथील प्रकाश खारोडे असं जवानाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी प्रकाश खारोडे हे लष्करातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून गावातील नागरिकांनी एक समिती तयार केली. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून गाव भरात स्वागताचे बॅनर्स लावले. घरोघरी रांगोळी काढल्या. ज्यावेळी प्रकाश गावांत आला त्यावेळी तोफांची सलामी देत फटकेबाजी, न ढोल ताशांच्या गजरात अचानक झालेले हे स्वागत पाहून जवान प्रकाश खारोडे भारावून गेले होते. अक्षरश: गावकऱ्यांचे प्रेम पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

देशसेवा करून गावी पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावुक झाले होते. जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली होती. यावेळी पूर्ण गाव सजून धजून उभे होते. सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबियांना.. जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते. जवानाचा गावात प्रवेश होताच तोफांची सलामी देऊन कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आले. 17 वर्षे देशसेवा करून गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बीड जिल्ह्यातील शेकडो तरुण आज देशसेवेसाठी लष्करात आहेत. कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातून आतापर्यंत 21 जवान शहीद झाले आहेत. मात्र, देशसेवा करून सुखरूप परतणाऱ्या जवानाचं अनोखं स्वागत करून शिरूरच्या गावकऱ्यांनी नवीन आदर्श घालून दिला आहे. या अनोख्या मिरवणुकीची आणि जंगी स्वागताच्या प्रथेची चर्चा जिल्ह्याभरात सुरु आहे.

First published: May 4, 2019, 8:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading