मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बळीराजाचं शोषण! रिटेलला 100 रु तर वाईन उत्पादकांना 10 रु. किलोने करावी लागतेय द्रांक्षाची विक्री

बळीराजाचं शोषण! रिटेलला 100 रु तर वाईन उत्पादकांना 10 रु. किलोने करावी लागतेय द्रांक्षाची विक्री

त्यामुळे शेतकरी रिटेल बाजाराता द्रांक्षांचा अधिकाधिक खप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी रिटेल बाजाराता द्रांक्षांचा अधिकाधिक खप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी रिटेल बाजाराता द्रांक्षांचा अधिकाधिक खप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) प्रभावित झालेल्या देशांमध्ये जर्मनी, इंग्लंड आणि नेदरलँड यांचाही समावेश आहे. या तीनही देशात भारतीय द्रांक्षांची सर्वात मोठी आयात केली जाते. मात्र कोविड – 19 (Covid -19) मुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे द्रांक्षांच्या उत्पादकांना देशातील बाजारात अत्यंत कमी दरात दाक्षांची विक्री करावी लागत आहे.

महाराष्ट्रातील बळीराजाला ही द्राक्ष केवळ 5 ते 10 रुपये किलोने विकावी लागत आहे. या पैशांतून द्राक्षांच्या लागवडीची रक्कमदेखील सुटत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे घरगुती रिटेल मार्केटमध्ये द्राक्ष 90 ते 100 रुपये किलोने विकले जात आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटात सप्लाय साखळीला तोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात आपलं उत्पादन विकावं लागत आहे. राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद यांच म्हणणं आहे की, कोरोनामुळे द्रांक्षांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी रिटेल बाजाराता द्रांक्षांचा अधिकाधिक खप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच वाईन तयार करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करू शकतात. याची चिंता असल्याने द्रांक्षांचा किमान दर ठरवून द्यावा अशी मागणी केली आहे.

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 4500 च्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत सर्व सेवा सुरळीत होण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 20 एप्रिलनंतर अनेक ठिकाणी हळूहळू कामांची सुरुवात केली जात आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण अत्यंत आवश्यक आहे.

संबंधित - केदारनाथच्या गुरुंना केलं क्वारंटाइन, मुकुट पोहोचवण्यासाठी 1800 KM केला प्रवास

कोरोनाव्हारसविरोधातील लसीसाठी इज्राइलच्या शास्त्रज्ञाला मिळालं यूएस पेटंट

धारावीत 24 तासांत 30 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 168 वर

First published:

Tags: Coronavirus, Farmer