Home /News /maharashtra /

झाडाला पकडून राहा; व्हॅनसह चालक गेला वाहून, रात्रीच्या अंधारात बचावकार्याचा थरारक VIDEO

झाडाला पकडून राहा; व्हॅनसह चालक गेला वाहून, रात्रीच्या अंधारात बचावकार्याचा थरारक VIDEO

चालकाने व्हॅन पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यातच व्हॅन अडकली.

औरंगाबाद, 14 जून : औरंगाबादसह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले अचानक भरून वाहू लागले. अशातच पाण्यात पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन जणांना वाचवण्याची थराराक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात शनिवारी सर्वत्र धो-धो पाऊस पडला. त्यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते.   मुंबई हायवे (लासूर स्टेशनकडे जाणारा रोड) देवगिरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने पूल वाहून गेला होता. याच वेळी एक पिक अप व्हॅन पुलावरून जात होती. चालकाने व्हॅन पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यातच व्हॅन अडकली. पाण्याचा वेग इतका होता की, काही वेळाच व्हॅन वाहून गेली. सुदैवाने चालक व्हॅनमधून बाहेर पडला. स्थानिक रहिवासी असलेल्या लोकांना ही बाब लक्षात आली. बिरजूलाल तरईय्यावले आणि मोहनसिंग सलामपुरे यांनी या तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली. पाण्यात अडकलेल्या या तरुणाने एका झाडाला पकडून ठेवले होते. पाण्याचा प्रचंड वेग वाढला होता. स्थानिकांनी या तरुणाला झाडाला पकडून राहण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत दोरीची व्यवस्था करण्यात आली आणि या तरुणाकडे दोरी फेकण्यात आली. त्यानंतर  दोऱ्याच्या साह्याने या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्रीच्या अंधारात हे सगळे बचावकार्य सुरू होते. हेही वाचा - पुण्याच्या बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सची व्यथा, PM मोदींना लिहिलं पत्र यासाठी बिरजूलाल व मोहनसिंग यांनी जीवाची पर्वा न करता त्याला वाचवण्यात यश आले यामध्ये  लालचंद सूर्यवंशी, अक्षय सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, सुरज सूर्यवंशी, बजरंग आदींनी मदत केली. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. स्थानिक नागरिकांनी केलेल्या कार्यच सर्वत्र कौतुक होत आहे.   संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: औरंगाबाद

पुढील बातम्या