Home /News /maharashtra /

Elegant Photos: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा, फुलांची मनमोहक आरास

Elegant Photos: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा, फुलांची मनमोहक आरास

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिना निमीत्त श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास सुंदर (Beautiful Tricolor Flowers) अशी तिरंगा रंगाच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.

सोलापूर, 26 जानेवारी: यंदा भारत देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिना निमीत्त श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास सुंदर (Beautiful Tricolor Flowers) अशी तिरंगा रंगाच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पुण्याचे विठ्ठल भक्त सतीश आण्णा चव्हाण आणि पोफळे कुटुंबीया तर्फे ही फुलांची आरास करण्यात आली आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून विठ्ठल -रुक्मिणीला पारंपरिक पोशाख करून तिरंगा रंगाचे उपरणे घालण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणीचा देव्हारा, गाभारा चौखांबी, सोळखांबी हा मंदिरातील सर्व परिसर तिरंगा रंगात सजला आहे. विविध फुलांच्या तिरंगा सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच सुंदर दिसत आहे. मंदिरातील तिरंगा सजावटीमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीपर झाले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून देश आणि धर्मासाठी एकत्र येऊन चांगले काम करण्याचा संदेश विठूराया देत आहे असे प्रत्यंतर येत आहे. आज 73 वा प्रजासत्ताक दिन 1950 साली या दिवशी देशाची संविधान (The Constitution Of The Country) लागू झालं. या खास दिवशी राजधानी दिल्लीतील राजपथावर दरवर्षी भव्य परेडचे आयोजन केले जाते. देशाच्या आन, बान आणि शानची एक शानदार झलक बुधवारी राजपथावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन 2022 च्या निमित्ताने, भारताच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक विविधतेची झलक बुधवारी दिल्लीच्या राजपथवर पाहायला मिळेल. राजपथ येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद तिरंगा फडकवणार आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Solapur (City/Town/Village), Vitthal mandir

पुढील बातम्या