रिपोर्ट करा, घरगुती हिंसाचाराला लॉकडाऊन करा; खेळाडू-अभिनेत्यांचं महिलांना आवाहन

रिपोर्ट करा, घरगुती हिंसाचाराला लॉकडाऊन करा; खेळाडू-अभिनेत्यांचं महिलांना आवाहन

लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सहन न करता पुढे येऊन सांगण्याची गरज आहे

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 3 मेपर्यंत केली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Covid - 19) संख्येने 4000चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आणखी एक चिंता महाराष्ट्राला सतावत आहे.

लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाबी बंद असल्याने सर्वजणांना घरात बसून लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काही ठिकाणी वर्क फ्रॉर्म होम सुरू आहे. यादरम्यान घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. आधीच महाराष्ट्र संकटात असताना घरगुती हिंसाचाराच्या घटना योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यासाठी काही प्रसिद्ध अभिनेते आणि खेळाडूंनी एकत्र येत संदेश देणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून ज्या महिलांवर घरगुती हिंसाचार होत आहे, त्यांना समोर येऊन तक्रार करण्याच आवाहन केलं जात आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, सोनाली कुलकर्णी, श्रेयश तळपदे याशिवाय सचिन तेंडुलकर, अजिक्य राणे, रोहित शर्मा यांनी एकत्र येत मराठीतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. घरगुती हिंसाचाराविरुद्ध नक्की तक्रार नोंदवा आणि या हिंसाचाराला आळा घाला. यासाठी LockdownDomesticViolence हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. अशा स्वरुपाचा व्हिडीओ हिंदीतही प्रदर्शित करण्यात आला आहे. घरगुती हिंसाचाराची तक्रार असल्यास 100 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवा.

संबंधित - देशातील 'या' 10 जिल्ह्यात कोरोनाचं थैमान, 49.39 टक्के बाधित रुग्ण या भागातील

धक्कादायक! 24 तासात 552 नवे कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

First published: April 19, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या