Home /News /maharashtra /

गुजरात भाजपचं ऑफिस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केला गंभीर आरोप

गुजरात भाजपचं ऑफिस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केला गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

  मुंबई, 11 एप्रिल : 'देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे. हे राजकारण नाही तर काय आहे?' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर (Remedesivir injection) मोफत वाटपाच्या मुद्द्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. 'कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्र सरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे,' असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या इंजेक्शनवरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ उडाला आहे. कारण एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुडवडा जाणवत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप ही स्थिती सुधारलेली नाही. रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करत असल्याचं चित्र आहे. अशातच नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे. यावर भाजपकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, हे पाहावं लागेल.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Coronavirus, Nawab malik

  पुढील बातम्या