नाशिकमध्ये remdesivir injection चा गंभीर तुटवडा, छगन भुजबळ म्हणाले...

नाशिकमध्ये remdesivir injection चा गंभीर तुटवडा, छगन भुजबळ म्हणाले...

गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरांमध्ये रेमडीसीवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला

  • Share this:

नाशिक, 10 एप्रिल : रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी (remdesivir injection) अखेर नाशिककरांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरांमध्ये रेमडीसीवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला. तर दुसरीकडे, 'रेमडीसीवीर इंजेक्शन काही आमच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात तयार होत नाही' अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.परंतु, रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून वण वण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉकटर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केलं होतं.

IPL 2021 : रैनाचा स्फोटक कमबॅक, अर्धशतकानंतर CSKच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून इशारा

पालकमंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये असून त्यांनी तरी यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. मात्र,पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र अगदी हताश प्रतिक्रिया दिली आहे. 'रेमडीसीवीर इंजेक्शन काही आमच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात तयार होत नाही, साठा जसा मिळतो तसा आम्ही वितरित करतो'.

लॉकडाऊनमध्येही करा 'चीअर्स', दारुच्या होम डिलिव्हरीला मुंबई मनपाची परवानगी

एकंदरीत अत्यंत विदारक परिस्थिती नाशकात तयार झाली असून हेच चित्र उत्तर महाराष्ट्रात आहे. उपायकारक म्हणून खरं तर या इंजेक्शनचं नाव झाल्यानं नेमकं करायचं तरी काय ? हा प्रश्न आता आरोग्य यंत्रणांना पडलाय. दरम्यान,अन्न आणि औषध प्रशासनानं, रेमडिसिव्हीर उत्पादन करणाऱ्या आठही कंपन्यांसोबत पाठपुरावा सुरू ठेवला असून येत्या 2 दिवसांत साठा उपलब्ध होईल अशी माहिती दिली असली तरी मागणी मोठी असल्यानं, या आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायचं तरी कसं ? हा प्रश्न आता तरी अनुत्तरीत आहे. एकीकडे लॉकडाऊनचे कडक निर्बंध, सरकारने लागू केले असले तरी दुसरीकडे याच निर्बंधांना झुगारण्याची मानसिकता समोर आल्यानं, तातडीनं पावलं उचलली नाही तर मोठा संघर्ष उभा राहणार हे नक्की.

Published by: sachin Salve
First published: April 10, 2021, 11:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या