मुंबई, 17 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळं बंद आहेत. पण राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. त्यानंतर आता मशिदी पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अस्लम शेख हे पुढे आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत थेट गणेश विसर्जनाला बंदी त्याऐवजी दिले हे पर्याय
एैतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलाॅकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली.
सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुलांवर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालंं पद
अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरू करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने अनलॉक 2 ची घोषणा करत राज्य सरकारांना आदेश जारी केले. यात राज्यात सर्वच गोष्टी सुरू होत आहेत. परंतु, मंदिर उघडण्यास अजूनही राज्य सरकारने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित मुंबईत कुष्णंकुज बंगल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते.
पुरुषाही लाजवेल या महिलेने केलेलं काम, पुण्यात कोरोना मृतांसाठी मोलाचा उपक्रम
महाराष्ट्रातील देवस्थानं लवकर सुरू करावीत अशी मागणी या पुरोहितांनी राज ठाकरेंकडे केली. जवळपास 15 मिनिटं पुरोहित आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.