पालघर, 29 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्तृव्य बजावत आहे. एकीकडे देवासारखे डॉक्टर धावून आले आहे, तर दुसरीकडे पालघरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पालघरमधील वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाडा पोलिसांनी आरोपी गणेश बदादे याला अटक केली आहे.
हेही वाचा - कोरोनावर लस शोधणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये 'ही' भारतीय शास्त्रज्ञ
मंगळवारी सायंकाळी वाडा तालुक्यातील अलमान येथील महेश बदादे या रुग्णाला अशक्तपणा आल्याने त्याला महेशचा भाऊ गणेश बदादे आणि आई यशोदा बदादे हे वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल शिराळ यांनी रुग्ण महेशची तपासणी केली आणि रुग्णाचा भाऊ गणेश व आई यशोदा यांना ओपीडी मधून केसपेपर काढून आणण्यास सांगितले.
परंतु, आरोपी गणेश आणि यशोदा बदादे यांनी तसे न करता डॉक्टरांना अगोदर रुग्णाला सलाईन लावा आणि उपचार करा, असा आग्रह धरत शिवीगाळ करून दमदाटी केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यानंतर आरोपींनी डॉ. अतुल शिराळ, त्यांचे सहकारी डॉ. अभिषेक दुबे आणि डॉ. तरुण पांडे यांना मारहाण केली.
हेही वाचा -दारूची दुकाने बंद का? एम्सच्या डॉक्टरांनी काय सांगितलंय, ते एकदा वाचाच!
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून डॉक्टरांची सुटका केली. हा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आणि दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांना ताब्यात घेलं.
याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गणेश आणि यशोदा बदादे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.