Home /News /maharashtra /

Rekha Jare Murder Case: बाळ बोठेच्या अटकेनंतर रेखा जरे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, या कारणामुळे दिली होती सुपारी

Rekha Jare Murder Case: बाळ बोठेच्या अटकेनंतर रेखा जरे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, या कारणामुळे दिली होती सुपारी

Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली आहे. हा खून होण्यामागचं कारण धक्कादायक आहे.

अहमदनगर, 13 मार्च: यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare Murder Case) प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर हैदराबाद मधून अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील हा एक मोठा ट्विस्ट मानला जात आहे. कारण बोठे गेल्या साडेतीन महिन्यापासून फरार होता. हे प्रकरणाच्या मुळाशी नेमकं काय कारण आहे, याबाबत बोलताना पोलिसांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अद्याप या प्रकणाचा तपास करत असल्याची प्रतिक्रिया नगर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात बोठेचा शोध कसा लागला याबाबत माहिती दिली. दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला आहे. भविष्यात आपली बदनामी किंवा गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणून बाळ बोठेने हा टोकाचा निर्णय घेतला होता. 30 नोव्हेंबर रोजी पुण्याहून अहमदनगरला येत असताना यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटामध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली. ही निघृण हत्या झाली त्यावेळेस यावेळेस रेखा जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो काढला होता. त्याच फोटोवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. (हे वाचा-'आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ...', सचिन वाझेंचं धक्कादायक WhatsApp Status) या तपासात बाळ बोठेने सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणांमध्ये सागर भिंगारदिवे, आदित्य  चाळके, ऋषिकेश पवार, फिरोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना हत्येची कबुली दिली होती मात्र मात्र बाळ बोठे त्यानंतर फरार होता. अखेर पोलिसांनी बाळ बोटेला हैदराबादच्या बिलालापूर भागातील हॉटेलमधून अटक केली. याशिवाय त्याला मदत करणारा जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अजय चाकाली (वय 25 ,आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30,आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय 52, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली, तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (हैद्राबाद) ही महिला फरार आहे. बोठे याला अहनगरमधून मदत करणारा महेश वसंतराव तनपुरे हा देखील मदत करत होता. त्याला आज सकाळी अटक करण्यात आली. (हे वाचा-हुंड्यासाठी दबाव म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं नव्हे, न्यायालयाचा निर्णय) मुलाने केली फाशीची मागणी रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आरोपी बाळ बोठे याला अखेर आज अटक करण्यात आल्यानंतर रेखा जरे यांच्या मुलाने समाधान व्यक्त केलं आहे. मात्र ज्या पद्धतीने माझ्या आईची हत्या आली, त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल झरे यांनी केली आहे. दरम्यान समाजात बाळू बोठे याची मोठी दहशत होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकांना त्याने त्रास दिला होता. पत्रकारितेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे अशा आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अॅड सुरेश लगड यांनी केली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Murder, Murder Mystery, Murder news

पुढील बातम्या