Home /News /maharashtra /

रेखा जरे हत्याकांड! आरोपी पत्रकाराचं आणखी एक प्रकरण आलं समोर

रेखा जरे हत्याकांड! आरोपी पत्रकाराचं आणखी एक प्रकरण आलं समोर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाबाबत दररोज नवनवीन खुलासा होत आहे.

    अहमदनगर, 27 डिसेंबर: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे (NCP Rekha Jare Murder Case) हत्याकांडाबाबत दररोज नवनवीन खुलासा होत आहे. संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) अद्याप फरारच आहे. मात्र, आरोपीच्या अडचणीत आणखी वाढ झाली झाली. आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेनं आरोपी बाळ बोठेच्या विरोधात कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा 24 दिवसांपासून फरार आहे. हेही वाचा...भामट्यांनी लढवली अनोखी शक्कल, दुधाच्या नावाखाली अशी सुरू होती गोमांस वाहतूक राजकीय वरदहस्त डॉक्टरला घेतलं ताब्यात...दुसरीकडे, रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात राजकीय वरदहस्त असलेल्या डॉ. निलेश शेळकेला चौकशीसाठी पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. अनेक प्रकरणात डॉ. शेळकेविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आता डॉ. निलेश शेळके याला रेखा जरे हत्याकांड प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्याकांड करण्यात आली होती. हत्याकांड झाल्यानंतर मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार असल्याने त्याला मदत करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या हत्याकांडातील आरोपीला मदत केली का? म्हणून निलेश शेळके याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. डॉ. निलेश शेळके बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी गेली अडीच वर्षांपासून फरार होता. काय आहे प्रकरण? 30 नोव्हेबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. हेही वाचा...नाथाभाऊ निघाले मुंबईला... पत्रकारानं विचारलं असता म्हणाले 'येता का लग्नाला?' या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली. रेखा जरे यांची सुपारी ही अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिल्याचे तपासातून समोर आले आहे. बाळासाहेब बोठे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या