मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रत्नागिरीतील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा-जिल्हाधीकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार पैकी 3261 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील एसटीच्या 2143 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. संप नाही मिटला तर आज रात्री गुन्हे दाखल करण्याचे पत्र विभागीय नियंत्रकांकडून पोलिसांना दिले जाईल.

रत्नागिरी,18 ऑक्टोबर:संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसटी विभागीय नियंत्रकाना दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार पैकी 3261 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील एसटीच्या 2143 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. संप नाही मिटला तर आज रात्री गुन्हे दाखल करण्याचे पत्र विभागीय नियंत्रकांकडून पोलिसांना दिले जाईल. दरम्यान राज्यभरात दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आधीच संपकरी कर्मचाऱ्यांना जेलमध्ये टाकायची धमकी दिली होती. आता राज्य सरकार हा प्रश्न कसा सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Ratnagiri, Strike

पुढील बातम्या