मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वृद्धाचा मृतदेह दफन करण्यास नकार, भिवंडीत घडला धक्कादायक प्रकार

वृद्धाचा मृतदेह दफन करण्यास नकार, भिवंडीत घडला धक्कादायक प्रकार

याप्रकरणी सोमवारी रात्री दफनविधीस विरोध करणाऱ्या ट्रस्टींविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भिवंडी, 17 मार्च :  दफन विधी करण्यासाठी जनाजा घेऊन कब्रस्थानात गेलेल्या वृद्ध इसमाचे मृतदेह दफन करण्यास नकार देत प्रेताची अप्रतिष्ठा केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कोटरगेट येथील दफनभूमी इथं  घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री दफनविधीस विरोध करणाऱ्या ट्रस्टींविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसीम रजा, शमीम रजा, युसूफ रजा, शकील पाणी, मंसूर आणि इतर ट्रस्टी अशी गुन्हा दाखल झालेल्या ट्रस्टींनी नावे आहेत. 2 मार्च रोजी शहरातील मंगलबजार स्लॅब इथं राहणारे वृद्ध इसम रज्जब अली हसरत अली अंसारी ( वय 64 ) यांचे निधन झाले होते. त्यांच्या दफनविधीसाठी नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह कोटरगेट दफनभूमीत आणला होता. मात्र, सदरचा मृतदेह दफन करण्यास दफनदार मन्सूर याने नकार देत दफनभूमीचे ट्रस्टी नसीम रजा, शमीम रजा, युसूफ रजा, शकील पाणी, मंसूर आणि इतर ट्रस्टी यांनी मनाई केली असल्याचे सांगून नमाज पठण आणि दफन विधीस मनाई केली होती. विशेष म्हणजे, मयत रज्जबअली अंसारी हे (तबलिगी) मुस्लीम असल्याचा भेदभाव करून त्यांच्या प्रेतास दफन करण्यास मनाई केली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मयत रज्जबअली यांचा मुलगा जावेदअली अंसारी याने सोमवारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत वडिलांच्या प्रेताची अप्रतिष्ठा आणि प्रेत दफन करण्यास मनाई केल्याप्रकरणी कोटरगेट दफनभूमी ट्रस्टींविरोधात तक्रार केली. त्यानंतर या ट्रस्टींवर कलम 297, 341, 34 प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय कांबळे करीत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या