आजपासून 12वीची फेरपरीक्षा

आजपासून 12वीची फेरपरीक्षा

विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येणार आहे.

  • Share this:

11जुलै:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेर परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे. २८ जुलैपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.

मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील दहा हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. तसेच जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मात्र ज्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत असे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येणार आहे. फेरपरीक्षा पूर्वी ऑक्टोबरमध्ये घेण्यात यायची.

या वर्षी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेत 1,50,072 विद्यार्थी नापास झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading