भिवंडी, 26 जून: शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती असलेला हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणू काही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांनी खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंगच्या व्यवसायात गुंतले आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी येथील महिलांसाठी सामाजिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती खान यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात देहविक्री न करता संसर्ग टाळण्यासाठी निर्धार केला आहे. त्या दरम्यान अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथील 565 महिलांना वेळोवेळी अन्नधान्य, इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण झाले.
हेही वाचा...धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या
लॉकडाऊन कालावधी वाढत गेला तशी येथील महिलांची तगमग वाढली. दोन वेळचं जेवण मिळतं पण इतर खर्चासाठी, घरभाडे यासाठी कोणाकडे हात पसरणार. वेदनेतून महिलांनी आम्हाला काम पाहिजे, या साठी तगादा लावला होता. करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या संचालिका स्वाती खान यांनी तहसीलदार व उद्योगपती यांच्या माध्यमातून महिला काम मिळवून देण्यासाठी चंग बांधला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. येथील महिलांना अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम मिळालं आहे.
येथील काम करण्यास उत्सुक असलेल्या निवडक 25 महिलांची प्रथम या साठी निवड करून त्यांना 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांचे काम समाधानकारक राहिल्यास अगरबत्ती पॅकिंगचे काम निरंतर सुरु राहणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत महिलांना 210 रुपये प्रतिदिन मानधन स्वरूपात दिले जाणार असून सायंकाळी महिलांना हळद दूध व उकळलेले अंडे असा पौष्टिक आहार देत त्यांना प्राणायामाचे धडे दिले जात आहेत.
लॉकडाऊन काळात आम्हाला संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य मुबलक मिळाले, पण या कामाने आमची पैशांची नड दूर झाली असून हे काम असेच सुरु राहिले. आपण देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडू, असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... शिवसेनेनं सत्ता समिकरण पाहून 27 गावांचे केलं तुकडे, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप
देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत त्यांच्या मुलांना सुद्धा स्वयंरोजागर करता यावा, यासाठी सध्या चायना लायटिंगला विरोध होत असल्याने त्यांना लायटिंग तोरण, दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व कामातून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असल्याचे महिलांनी बोलून दाखवले आहे.