महाराष्ट्र गारठला.. नाशिकमध्ये निच्चांकी तापमान, मुंबईत थंडीचा 10 वर्षांतील विक्रम

महाराष्ट्र गारठला.. नाशिकमध्ये निच्चांकी तापमान, मुंबईत थंडीचा 10 वर्षांतील विक्रम

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि कोरड्या हवामानामुळे देशातील बहुतांश राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली आहे.

  • Share this:

मुंबई,17 जानेवारी: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि कोरड्या हवामानामुळे देशातील बहुतांश राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रही गारठला आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात किमान आणि कमाल तापमान हंगामात प्रथमच सरासरीखाली गेल्याने सर्वत्र बोचरी थंडी पसरली आहे. राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. नाशिकमध्ये 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील आठवड्याभरात पारा अजून घसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईत थंडीचा 10 वर्षांतील विक्रम

या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद गुरुवारी शहरात झाली. दहा वर्षांत प्रथमच कमाल तापमान 25 अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानातही घट झाली आहे. विदर्भातील थंडीच्या लाटेची स्थिती निवळली असली, तरी या भागात अद्यापही गारठा कायम आहे. मुंबईत हवामान विभागाने किमान तापमानासंदर्भात सूचना जारी केली आहे. शुक्रवारी रात्री तापमान 14 अंश सेल्सियासपर्यंत जाईल. पण थंडगार हवेमुळे मुंबईकरांना 12 अंश सेल्सियास खाली तापमान गेल्यासारखा अनुभव येईल. त्यामुळे मॉर्निंग वॉक वेळी बाहेर पडताना पुरेसे गरम कपडे असतील याची काळजी घ्या,असे ट्वीट करत मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानीदेशक के.एस. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळा सुरू होऊनही मुंबईत मात्र त्याचा परिणाम जाणवत नव्हता. अखेर आता मुंबईत हळूहळू गारठा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. पारा हळूहळू खाली येऊ लागल्याने आता लवकरच मुंबईत थंडीचा मौसम सुरू होणार आहे. अशा प्रकारची थंडी मुंबईकरांना 17 जानेवारीपर्यंत अनुभवता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2020 08:15 AM IST

ताज्या बातम्या