Home /News /maharashtra /

उद्योजक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी

उद्योजक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी

हाऊस वाइफ असणाऱ्या महिलांवर घराची जबाबदारी खूप जास्त आहे, अशा परिस्थितीत नोकरी करून पैसे मिळवणे त्यांना फार अवघड आहे. मात्र तुम्ही घरबसल्या असे काही व्यवसया करू शकता, ज्यामुळे कमी वेळात तुम्ही जास्त पैसे मिळवू शकता.

हाऊस वाइफ असणाऱ्या महिलांवर घराची जबाबदारी खूप जास्त आहे, अशा परिस्थितीत नोकरी करून पैसे मिळवणे त्यांना फार अवघड आहे. मात्र तुम्ही घरबसल्या असे काही व्यवसया करू शकता, ज्यामुळे कमी वेळात तुम्ही जास्त पैसे मिळवू शकता.

सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

  मुंबई, 23 जानेवारी : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसित स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसित स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादीकरिता हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्थापित करेल, असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. हेही वाचा - नोकरीची मोठी संधी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये नुकताच स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसंच गुणवत्ता परीक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Business News, Job

  पुढील बातम्या