भाजपसाठी निवडणूक झाली अवघड? पंकजा मुंडे यांच्या समर्थकाची बंडखोरी

भाजपसाठी निवडणूक झाली अवघड? पंकजा मुंडे यांच्या समर्थकाची बंडखोरी

उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 11 नोव्हेंबर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. माजी बीड भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात.

उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीचंही गणित बिघडणार?

भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीवरून बंडखोरी सुरू असतानाच महाविकास आघाडीत सुद्धा सर्वकाही अलेबल नसल्याचं चित्र आहे. कारण महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

पदवीधर निवडणुकीत मराठवाडा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे सोबत असलेल्या इतर पक्षाने उमेदवार उभा करणे अपेक्षित नाही. मात्र असे असतानाही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून सचिन ढवळे यांना उमेदवारी दिली असून याची घोषणा त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली.

Published by: Akshay Shitole
First published: November 11, 2020, 11:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading