मुंबई, 28 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांचा गट फोडून ९ दिवस गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला होता. पण, आता राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्यास सांगितल्यामुळे आमदार आता बॅगा पॅक करून महाराष्ट्राकडे रवाना झाले आहे. सर्व आमदारांना आता गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.
शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्याने अभुतपूर्व असा राजकीय सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. काल रात्री अचानक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी राजपालांची भेट घेतली. यानंतर राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (eknath shinde) हे गुवाहाटीहून महाराष्ट्राकडे रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. पण सर्व आमदारांना तुर्तास गोव्यात (shiv sena mla goa) ठेवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत त्या हॉटेलचे नाव ताज (taj hotel in goa) असल्याचे सांगण्यात आले आहे.
News18 lokmat ला मिळालेल्या माहितीनुसार बंडखोर आमदार आज खाजगी विमानाने (Spice Jet) 4.30 वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचणार आहेत. यासाठी गोव्यातील ताजमध्ये 71 रूम्स राखीव करण्यात ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 51 आमदार हे गोव्यामध्ये 'ताज कन्वेंशन' या हॉटेलमध्ये थांबतील आणि उद्या सकाळी मुंबईला पोहचतील असे सांगण्यात आले आहे.
काय खासियत आहे गोव्यातील ताज हॅाटेलची
- ताज हॅाटेल हे नामांकित आणि खाजगी बाबतीत अत्यंत सुरक्षित मानले जाते.
- मिटींगसाठी मोठे हाॅल आणि ह्या हॅाटेलला एकाच वेळेस १०० VVIP लोकांना उत्तम सुविधा देण्याची ताज हॅाटेलची खासियत आहे
- ताज हॅाटेल हे विमानतळापासून ४० किलो मीटर लांब असले तरी आमदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम हॅाटेल आहे.
- तसंच, देशातीलच नाही तर जगभरातील अनेक बडे राजकीय नेत्यांचे गोव्यातील आवडते हॅाटेल आहे.
- काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल आणि हाटेलमध्ये असलेला खाजगी बीच असं हे गोव्यातलं हॅाटेल आहे.
- सी दा दी गोवा हे हॅाटेल म्हणजे भूल भुलल्या आहे.
- हॅाटेल स्टाफ शिवाय या हॅाटेलमध्ये फेरफटका मारायला जावू शकत नाही
- या हॅाटेलमध्ये प्रत्येक रुम करता विशिष्ट स्टाफ आहे, कारण या हॅाटेलमधील प्रत्येक रुम यांची एक वेगळी खासियत आहे.
- बड्या राजकीय नेत्यांच्या छुप्या बैठकीकरता सी दा दी गोवा हे हॉटेल हे प्रसिद्ध आहे.
- या हॅाटेलमधून बाहेर जाण्यास जल मार्ग देखील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.