मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MLA Santosh Bangar : कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारणारे संतोष बांगर म्हणतात 'हे शिवसेनेकडून शिकलो'

MLA Santosh Bangar : कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारणारे संतोष बांगर म्हणतात 'हे शिवसेनेकडून शिकलो'

शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष बांगर (MLA santosh Bangar) यांच्याबाबत राज्यात जोरदार चर्चा झाली.

शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष बांगर (MLA santosh Bangar) यांच्याबाबत राज्यात जोरदार चर्चा झाली.

शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष बांगर (MLA santosh Bangar) यांच्याबाबत राज्यात जोरदार चर्चा झाली.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष बांगर (MLA Sanjay Bangar) यांच्याबाबत राज्यात जोरदार चर्चा झाली. दरम्यान पहिल्यांदा शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर आगपाखड केली होती नंतर तेच शिवसेनेसोबत बंडखोरीकरत शिंदे गटात सामिल झाल्याने त्यांच्यावर शिवसेनेतून टीका झाली. बांगर हे आक्रमक स्वभावाचे असल्याने त्यांनी एकाला जोरात कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर संजय बांगर यानी खुलासा केला आहे.

यावर बांगर म्हणाले कि, कितीही टीका झाली, तरी आपल्याला त्याची पर्वा नाही. गोरगरीब कामगार सकाळपासून कष्ट करतात. त्यांना जर पोटभर चांगलं जेवण मिळत नसेल, तर असा कायदा हाती घेणं माझ्यासाठी नवीन नाही. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम मी शिवसेनेकडून करत असतो. ज्या गरीबांनी मला निवडून दिले, त्यांच्यासाठी जर लढा द्यायचा नाही, तर कुणासाठी द्यायचा? यांना वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसेल, तर याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे कृत्य केल्याचे म्हणाले.

हे ही वाचा : vinayak mete : तो ट्रक कुणाचा? विनायक मेटे यांच्या पत्नीने 3 ऑगस्टच्या घटनेबद्दल व्यक्त केला संशय

दरम्यान, कागदावर कामगारांसाठी मध्यान्न भोजनात पक्वान्न असताना प्रत्यक्षात मात्र करपलेल्या पोळ्या मिळत असल्याचं बांगर म्हणाले. “संबंधित जिल्हाधिकाऱ्यालाही मी याविषयी बोललो. पण तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. मी विचारलं इथला व्यवस्थापक कोण आहे? तर त्याला काही माहितच नव्हतं. कागदोपत्री चवळी, वाटाणा, गूळ, शेंगदाणा, चपाती, भात असं सगळं म्हटलंय. पण जेवणात दुसरं काहीच नाही. तिथे फक्त भात, डाळ आणि करपलेल्या चपात्या एवढंच आहे, असं बांगर म्हणाले.

हे ही वाचा : शाहू महाराज आम्हाला माफ करा! डीजेच्या ठेक्यावर तरुणींचा सिगारेट ओढत अश्लिल डान्स, कोल्हापुरातला VIDEO व्हायरल

हिंगोलीत एका मध्यान्न भोजन केंद्राला संतोष बांगर यांनी 15 ऑगस्ट रोजी भेट दिली. या केंद्रात कामगारांना सरकारी योजनेतून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून संतोष बांगर यांना संताप अनावर झाला. रागाच्या भरात बांगर यांनी या केंद्राचं काम पाहाणाऱ्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. बांगर यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर सत्ताधारी पक्षात असूनही कायदा हातात घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. यासंदर्भात आता खुद्द बांगर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Shiv sena. शिवसेना

पुढील बातम्या