सख्ख्या भावांनीच केला बहिणीचा खून, मृतदेहाचे केले तुकडे; धक्कादायक कारण आलं समोर

सख्ख्या भावांनीच केला बहिणीचा खून, मृतदेहाचे केले तुकडे; धक्कादायक कारण आलं समोर

ठाण्यात सख्ख्या भावांनी बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

ठाणे, 22 जुलै: ठाण्यात सख्ख्या भावांनी बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील डायघर पोलिस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला आहे. बहिणीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन वारंवार होत असलेल्या भांडणाचा शेवट निर्घृण हत्येने झाल्याने डायघर गावात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

प्रतिभा प्रविण म्हात्रे (वय-29 वर्षे) असं मृत तरुणीचे नाव आहे. एप्रिल महिन्यात ती 15 दिवस घरी काही न सांगता बाहेरगावी गेली होती. ती परत आल्यावर तिला भावांनी तिला विचारले असता तिनं नीट उत्तरं न दिल्याने तिच्यात आणि भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण टोकाला जाऊन तीन सख्ख्या भावांनी लोखंडी सळईने प्रतिभाला बेदम मारहाण केली. त्यातच तिनं जीव सोडला. ही घटना कोणाला कळू नये या म्हणून तिघांनी बहिणीच्या शरीराचे तुकडे करुन तिला 1 मे च्या रात्रीच जाळून टाकले.

याबाबत कोणालाच काही माहित नसताना अचानक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रतिभाच्या भावांची कसून चौकशी केली. तिची हत्या करुन तिला जाळून टाकल्याचं तिघांनी कबूल केलं.

डायघर येथे राहणाऱ्या प्रतिभा हिचा विवाह 2009 साली झाला होता. मात्र, एका वर्षातच तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून प्रतिभा आपल्या आईवडील व भावासोबत डायघर येथे माहेरी राहत होती. प्रतिभा अधून मधून अचानक घर सोडून निघून जायची. ती कुठे जाते याची चौकशी भावांनी केली असता ती बिअर बारमध्ये महिला वेटर म्हणून देखील काम करीत असल्याची माहिती भावांना मिळाली होती. या प्रकारामुळे गावात बदनामी होत असल्याने प्रतिभाचे तिच्या भावांसोबत नेहमी भांडणे व्हायची. दरम्यान, एप्रिल महिन्यात प्रतिभा कोणालाही न सांगता अचानक घर सोडून निघून गेली होती.

हेही वाचा...धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं

15 दिवसानंतर ती घरी परतली. तेव्हा तिच्या भावंडांनी तिला इतके दिवस कोठे होतीस, असा जाब विचारला. या कारणावरून चार भावंडे आणि बहिणीत जोरदार भांडण झाले. त्यानंतर 1 मे रोजी रात्री प्रतिभाचे भाऊ नाथा अशोक पाटील (31), भगवान अशोक पाटील (24), बालाजी अशोक पाटील (20) आणि पांडुरंग अशोक पाटील यांनी संगनमत करून तिला लोखंडी सळीने मारहाण केली. तसेच तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी डायघर पोलिसांनी तिघा भावांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 22, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading