देवेंद्र सरकारची गती मंदावली ; राज्यात कधीही निवडणुका -एकनाथ खडसे

देवेंद्र सरकारची गती मंदावली ; राज्यात कधीही निवडणुका -एकनाथ खडसे

डिसेंबरमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीच्यावेळी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीये.

  • Share this:

23 मे : राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी वर्तवलंय. डिसेंबरमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीच्यावेळी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीये.

माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. फडणवीस सरकारच्या कामाचा वेग मंदावल्याचं खडसे यांनीच म्हटलंय.  शिवाय सरकारची कामं आणि योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नसल्याचा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला. एकाचवेळी मध्यावधीचं भाकीत आणि आपलंच सरकार निष्क्रिय असं खडसेंनी म्हटल्यानं त्यांची नाराजी पुन्हा समोर आलीये. खडसे एवढ्यावरच थांबले नाहीतर  कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहावं असं आवाहनही त्यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 09:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading