विठ्ठलाचा अभिषेक सुरू असताना गाभाऱ्यात अधिकाऱ्याचाही स्नान? वाचा काय आहे सत्य

प्रक्षाळ पूजेदरम्यान विठ्ठलाचा अभिषेक सुरू असताना मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना देखील पुरोहितांनी स्नान घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडिययावर व्हायरल झाला आहे

प्रक्षाळ पूजेदरम्यान विठ्ठलाचा अभिषेक सुरू असताना मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना देखील पुरोहितांनी स्नान घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडिययावर व्हायरल झाला आहे

  • Share this:
पंढरपूर, 12 जुलै: विठ्ठल-रुक्मिणीचे नवरात्र आणि आषाढी यात्रेनिमित्त नित्योपचार बंद करण्यात आले होते. ते नित्योपचार प्रक्षाळ पूजेनेनंतर गुरुवारी पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, प्रक्षाळ पूजेदरम्यान विठ्ठलाचा अभिषेक सुरू असताना मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना देखील पुरोहितांनी स्नान घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडिययावर व्हायरल झाला आहे. मंदिर समितीचे माजी सदस्य व भागवताचार्य वा.ना उत्पात यांनी संबंधित घटनेचा निषेध केला आहे. आता या प्रकारामागीत सत्य उजेडात आलं आहे. हेही वाचा...'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारू दुकानं सुरू, भाजप नेते इंदोरीकरांच्या भेटीला भागवताचार्य वा.ना उत्पात यांनी सांगितलं की, संबंधित घटना अजानतेपणी घडली असून संबंधित कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचा यात काही दोष नाही. झालं असं की,  विठ्ठल मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी आणि मंदिरातील पुरोहित श्री विठ्ठलाला अभिषेक घालत होते. मी ही देवाचा पायावर जलाभिषेक करण्यात मग्न झालो होतो. पाठीमागून चुकुन पाणी माझ्या अंगावर पडले आणि त्याचा विर्पयास झाला. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात स्नान वगैरे केल्याचे वृत्त सपशेल चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...पंतप्रधान मोदी असताना चीनने जमीन हिसकावून घेतलीच कशी? राहुल गांधी पुन्हा बरसले आषाढी वारीच्या काळात मानाच्या पालख्या सोडून कोणत्याही सामाजिक व राजकीय संघटनांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे हा खोडकरपण करण्यात आला आहे. त्यामुळे घटनेचा विर्पयास करून विठ्ठल जोशी यांचा गाभाऱ्यात स्नान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल करण्यात आल्याचं वा .ना उत्पात यांनी सांगितं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: