सरकार स्थापनेचा पेच सुटणार? 'या' आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या घडामोडी

सरकार स्थापनेचा पेच सुटणार? 'या' आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई ते दिल्ली, सत्ता स्थापनेपासून ते शेतकऱ्यांच्या पीकविम्यापर्यंत आजच्या ठळक बातम्यांवर एक नजर.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. बैठकांचा सिलसिला सुरू आहे. दुसरीकडे शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांच्यावर एक नजर.

1. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवार आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत. शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रमावर झालेल्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास दिल्लीत ही बैठक पार पडण्याची शक्यता आहे. सत्तेचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2.सद्याच्या राजकीय स्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेची महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे राजकीय संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झालाय. यावर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदारांसोबत उद्धव ठाकरे मातोश्रीवर संवाद साधणार आहेत.

PMC खातेदारांसाठी मोठी बातमी, आता काढता येणार एवढी रक्कम

3.राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेतेही या सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातल्याचं समजतंय. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

4. यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्याची शक्यता आहे. देशाचे नागरिक कोण, यासंदर्भात संज्ञा निश्चित करणारं विधेयक आज संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळातही हे विधेयक संसदेत आणलं होतं, पण राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही.

5. नवी दिल्लीत आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या दृष्टीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला केंद्राकडून दिलासा मिळणं आवश्यक आहे. तर, केंद्राच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

6. हायकोर्टानं दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नका 22 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 07:00 AM IST

ताज्या बातम्या