फडणवीस सरकारची बहुमत चाचणी कधी? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

फडणवीस सरकारची बहुमत चाचणी कधी? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

सत्तासंघर्ष आणि दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर: आजचा दिवस एकूण सत्तासंघर्ष आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा पाहा थोडक्यात.

1. महाराष्ट्रच्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात निकाल आज येणार आहे. बहुमत चाचणी घेण्यासाठी फडणवीस सरकाला किती कालावधी द्यावा यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.

2. 26 /11 हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 9 लाजता मरिन ड्राईव्ह जिमखाना स्मारकावर शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत.

3. देशाच्या संविधानाला आज 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं दिल्लीत संसदेमध्ये संविधान दिवसानिमित्त विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. तर देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. तर संसदेत आज पंतप्रधान मोदी संविधानाबाबत बोलण्याची शक्यता आहे.

4. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी राज्यपालांकडे सहा नावं सादर करण्यात आली आहेत. यामध्ये विखे पाटील, कालिदास कोळंबकर, पाचपुते, थोरात आणि वळसे पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व क्षण सोमवारी संध्याकाळी पाहायला मिळाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं एकत्र शक्तिप्रदर्शन करण्यात आलं यावेळी तीनही पक्षाच्या आमदारांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे.

6. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज 11 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे संघटनमंत्री व्ही सतीश, विजय पुराणिक आदी नेते उपस्थित राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नेमकी आपली काय राजकीय व्यूहरचना असली पाहिजे याबद्दल या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

7. 'राज्याच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडलाय आमदारांचे अपहरण करणं आणि दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणं यात कसली चाणक्य नीती? काकांनी जे कमावले तेच चोरुन मीच नेता माझाच पक्ष असं सांगणं वेडेपणाचा कळस. अजित पवार खोटं बोलत आहेत. अजित पवारांनी राज्यपालांना खोटं पत्र दिलं आहे.' सामनातून अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र

8.राज्यातील राजकारणाचा अभूतपूर्व क्षण आज मुंबईत पाहण्यास मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सर्व 162 आमदारांना घेऊन मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी ग्रँड हयात हॉटेलला 162 आमदारच नव्हते, असा दावा केला आहे.

9. सत्तेसाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांना वेड लागलं आहे. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा, असं सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याबरोबर सूत कसं जुळलं असं विचारलं तेव्हा त्यांनी या प्रश्नाला सुरुवातीला बगल द्यायचा प्रयत्न केला.

10.शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय वेगळी भूमिका मांडणार आणि नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

Published by: Kranti Kanetkar
First published: November 26, 2019, 8:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading