सत्तावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

सत्तावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या बैठकांचा सिलसिला सलग सुरू होता. आजही तिनही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे.या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा केला जावू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण आजच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

1. मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकासआघाडीत अद्यापही चर्चा सुरू. आज मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.

2. महाविकासआघाडीच्या बैठकांची मालिका आजही सुरू राहणार आहे. बैठकीत अंतिम निर्णय झाल्यास आजच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती.

3. शिवसेना नेते संजय राऊत आज सकाळी साडे नऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. भाडुंप इथे ही पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत राऊत काय बोलतात, याकडं साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

...आणि शरद पवारांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंना निवडलं!

4. आज महाविकासआघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

5. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे राजी, शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती, महाविकासआघाडीच्या बैठकीत सर्वपक्षीयांकडून उद्धव ठाकरेंचं अभिनंदन.

6. काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याच्या नावाबाबत अजूनही सस्पेन्स कायम, अजूनही गटनेत्याची निवड नाहीच, पुढचे काही दिवस काँग्रेस आमदारांना मुंबईतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

7. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

बाळासाहेबांची सेना निधर्मी, काँग्रेसच्या 'धोरणा'नं उद्धव ठाकरेंचं सत्तेचं 'तोरण'

8. 'शिवसेना आणि भाजपची युती हिंदुत्वावर आधारित होती. ही युती तुटणं हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी नुकसानदायक होतं. मात्र आता जी महाआघाडी झाली आहे ती संधीसाधूपणासाठी झाली आहे. त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकू शकणार नाही. ही महाआघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नाही,' असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपलं भाकित वर्तवलं आहे.

9. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बैठकीतल्या निर्णयाबद्दल संवाद साधला. अजून चर्चा संपली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

10. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच दिवशी बांगलादेशचा संपूर्ण संघ तंबूत. टीम इंडियाकडे 68 धावांची आघाडी. पाच बळी घेत इशांत शर्माची उल्लेखनीय कामगिरी.

Tags:
First Published: Nov 23, 2019 07:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading