मंत्रिमंडळविस्ताराबाबत आज निर्णय? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

मंत्रिमंडळविस्ताराबाबत आज निर्णय? 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या थोडक्यात.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: उद्धव ठाकरेंनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे सरकारचा आजचा पहिला दिवस आहे. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकासआघाडीला 3 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसात नवीन सरकार स्थापन करू असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या थोडक्यात.

1.मुख्यमंत्रिपदाची गुरुवारी शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दुपारी 1 वाजता राजभवनात जाऊन पदभार स्वीकारणात आहेत.

2.गेल्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं? याची श्वेतपत्रिका काढणार. किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी आणखी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे.

3.हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. महाविकासआघाडीत आज खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता.

4.उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर राज्यभरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.आतषबाजी आणि पेढे वाटून आनंद साजरा.

वाचा-...म्हणून संजय राऊत शपथविधी सोहळ्यातून बाहेर पडले!

5.महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्या आधी काही तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम घोषीत केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार. हा असेल मुख्य फोकस - शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार.

6.ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. किमान समान कार्यक्रमावरून सरकारवर ही टीका करण्यात आली आहे. किमान समान कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याचं फडणवीस म्हणाले.

7.काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श सोसायटी घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा चौकशी सुरू केल्याचे वृत्त होते. परंतु, अशी कोणतीही चौकशी केली जाणार नसल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे.

वाचा-BCCIचा प्रश्न; पृथ्वी शॉच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी?

8.महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता, असं वक्तव्य करून साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली. यानंतर भाजपने त्यांना संरक्षण समितीतून काढून टाकलं. पण हे सगळं शांत होत नाही तोच आता भाजपचे एक आमदार सुरेंद्र सिंह यांनीही नथुराम गोडसेबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. नथुराम गोडसेने चूक केली पण तो दहशतवादी नव्हता, असं त्यांनी म्हटलंय.

9.टी-20 मालिकेत परभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियानं 2 कसोटी सामन्यातही बांगलादेशला क्लिन स्विप दिला. दोन्ही कसोटी सामन्यात बांगलादेशला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. ऐतिहासिक डे-नाईट सामन्यातही भारताचेच वर्चस्व राहिले. एकाही दिवशी बांगलादेशच्या संघाला टीम इंडियाला टक्कर देता आली नाही. मात्र आता बांगलादेशच्या खेळाडूला सामना न खेळताच मोठा फटका बसला

10. व्हॉट्सअ‍ॅप 'डिलीट मेसेज' नावाच्या फिचरवर काम करत आहे, सध्या फक्त बीटा युजर्स वापरु शकतात. काही दिवसांपूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की, व्हॉट्सअॅप Disappearing Messeage’ हे फीचर आणण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर आता हे वैशिष्ट्य आता व्हॉट्सअॅप डिलीट मेसेजच्या नावाखाली आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

First published: November 29, 2019, 7:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading