ठाकरे सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा सुटेना, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

ठाकरे सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा सुटेना, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर: राज्यासह देशभरातील राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह देशविदेशातील ठळक घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

1. सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण खातेवाटप मात्र अद्यापही प्रलंबित आहे. खातेवाटपाचा पेच कायम असल्यानं येत्या दोन दिवसात करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तर दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी नवी योजना आणणार असल्याची विस्तारित मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती.

2. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा पाहायला मिळाला राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 10 तर शिवसेनेच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ही बेस्ट टीम असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला आहे.

3. पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री. अमित देशमुख, आदिती तटकरे, प्राजक्त तानपुरे, विश्वजीत कदमांसारखी यंग ब्रिगेडना मंत्रिमंडळात संधी.

4. खासदार संजय राऊत मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित. सुनील राऊतांना मंत्रीपद नाही. नाराजीची चर्चा केवळ अफवा असल्याचं संजय राऊतांचं स्पष्टीकरण.

5. दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, आणि रवींद्र वायकर या पाच शिवसेना नेत्यांना आणि माजी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यामागे गेल्या पाच वर्षातली कामगिरी हे कारण आहेच, पण त्याहीपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध किंवा नाराजी, भाजपशी जवळीक आणि इतर नावांची सरशी ही कारणं असल्याचं बोललं जात आहे. हे पाचही नेते मोठी खाती असणारे अनुभवी नावं होती, तरीही त्यांना मंत्रिपदांपासून दूर ठेवण्यात आलं.

हेही वाचा-'टीम ठाकरे'मधून पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कुणी केला कट?

6. जनरल बिपिन रावत पहिले संरक्षणप्रमुख. तर रावत यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची नियुक्ती

7. भूकंपाच्या धक्कांनी जम्मू काश्मीरमधील काही परिसर हादरला. 5.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. एनएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवितहानी झाले नसली तरी घरांचं नुकसान झालं आहे.

8. जून महिन्यापर्यंत एअर इंडिया विकत घेण्याची कुणाचीही तयारी नसेल तर मोदी सरकारला एअर इंडिया बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'एअर इंडिया'वर मोठं कर्ज आहे. सध्या 12 छोटी विमानं सुरू करण्यासाठीही आणखी निधीची आवश्यकता आहे. या सरकारी विमान कंपनीवर 60 हजार कोटींचं कर्ज आहे आणि सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी सुरू केली आहे.

9. 2020 च्या नव्या वर्षात पहिल्याच जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या राज्यवार सुट्या जाहीर केल्या आहेत.1 जानेवारीचा नव्या वर्षाचा पहिला दिवस, 2 जानेवारीला गुरु गोविंद सिंग यांची जयंती, 14 जानेवारीची मकर सक्रांत अशा सुट्यांचा या सुट्यांमध्ये समावेश आहे. 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तही बँका बंद असतील. वेगवेगळ्या कारणांमुळे बँकांना या महिन्यात 10 दिवस सुट्या आहेत. त्यामुळे तुमची बँकेची कामं उद्या मंगळवारच्या दिवशीच निपटून घ्या. सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचं स्वागत यामुळे सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण आहे. सुट्यांचा हंगाम असल्यामुळे ATM सेंटर्सवरही रीघ असेल. त्यातच बँकांना सुट्या असल्यामुळे तिथेही मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे आर्थिक कामं लवकर करून घ्यावी लागतील.

10. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी रेल्वे, बेस्टकडून जादा गाडय़ा

31 डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल फेऱ्या.

हेही वाचा-चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी या BMWसोबत काय केलं पाहा

Published by: Kranti Kanetkar
First published: December 31, 2019, 7:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading