नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर: एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

1. मंत्रिमंडळ विस्तार 30 तारखेलाच होणार असून आमची यादी तयार आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. शरद पवारांकडे सरकारचं रिमोट कंट्रोल आहे या म्हणण्यात तथ्य नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

2. मुंबईतला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत. येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातल्या 22 पेक्षा जास्त जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका एकत्रितपणे लढवत भाजपला धक्का देण्याची नवी खेळी खेळण्याचा निश्चय या पक्षांनी केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घातलं असून नव्या वर्षात ते भाजपला दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

3. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आज मुंबईत आंदोलन. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदानातून निघणार मोर्चा

4. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा आंदोलनं. योगी आदित्यनाथ सरकारकडून राज्यातील इंटरनेट सेवा खंडित. अनेक जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू.

वाचा-धक्कादायक...पोलीस उपमहानिरीक्षकांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

5. विधानसभेत पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराचं राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात रणशिंग. आज मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक. राम शिंदे बैठकीला उपस्थित राहणार.

6. डिटेंशन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर सरकार पाडा. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकरांचा एल्गार. अमित शाहांवरही शरसंधान.

7. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. गुरुवारी त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतलं होतं.

8. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील समाधीवर अभिषेक बंद करणार. समाधीची झीज होत असल्यानं विश्वस्तांचा निर्णय.

9. बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा आज 54 वा वाढदिवस. सलमानच्या बर्थ डे पार्टीला बॉलिवूडकरांची हजेरी. भाईजानवर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव.

10. एअरटेल पेमेंट बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गाइडलाइन्सवर आधारित 24x7 NEFT सेवा सुरू केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहक आता कधीही या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

वाचा-माकडांना बिस्कीट देण्यासाठी घाटात थांबला, तोल जाऊन 200 फूट दरीत कोसळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 07:26 AM IST

ताज्या बातम्या