GST बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

GST बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

देश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील आजच्या ठळक महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर: राज्यात सुरु असलेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आणि केंद्रातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे इथपर्यंत राज्यासह देश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या.

1. हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी सभागृहात शेतकऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे.

2. CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.

3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार झाला आहे. तर कितीही आंदोलनं केली तरी कायदा मागे घेणार नसल्याचा शाह यांचा ठाम निर्धार.

4. जामियातील लाठिमाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जालियनवाला बागेशी तुलना. हा तर शहिदांचा अपमान म्हणत फडणवीसांचं प्रत्युत्तर.

5. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. वस्तू आणि सेवा कराबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता. बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री जीएसटीबाबत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष.

वाचा-निवृत्त मेजरने भरचौकात सरपंचावर केला गोळीबार!

6. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार. दुचाकीवरू आलेल्या तीन तरुणांनी केला गोळीबार

7.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अजूनही पक्षावर नाराज आहे. वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत देणारे खडसे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे खडसे मोठा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

8. देशभर गाजत असलेल्या जामिया मिलिया विद्यापीठातल्या हिंचासार प्रकरणी आता अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. 15 डिसेंबरला जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत निदर्शने केली होती. त्यावेळी हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. त्यावर प्रचंड टीका झाली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे माजी आमदार असीफ खान यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

9. मराठी नाट्यसृष्टीतल्या नटसम्राटाची एक्झिट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार.

10. वेस्ट इंडिजविरुद्ध आज दुसरा वनडे सामना. मालिकेत बरोबरी करण्याचं टीम इंडियासमोर आव्हान.

VIDEO तोडफोड करणाऱ्यांना गोळ्याच घाला, केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2019 07:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading