विधिमंडळाचं आजपासून हिवाळी अधिवेशन, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

विधिमंडळाचं आजपासून हिवाळी अधिवेशन, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई,16 डिसेंबर: विधानसभेचं अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. तर आजपासून बँका आणि मोबाईलसंदर्भातील अनेक नियमही नव्यानं लागू केले जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

1. नागपूरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडी सरकारला घेरण्याच्या तयारीत. हिवाळी अधिवेशन एक आठवड्याचं असणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करणे हा कारभाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असल्याची माहिती.

2. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्यांवरून तपाण्याची चिन्हं आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक 'सावरकरां'चा मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात आणि बाहेरही लावून धरण्याची शक्यता जास्त आहे. तर, सरकारच्या वतीनं शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीत झालेला कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ होऊ शकतो.

वाचा-YouTube वर जाहिरातींमुळे Video सलग पाहता येत नसेल तर करा हे सेटिंग

3. संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात (Citizenship Amendment Act 2019) आता भडका उडालाय. दिल्लीतल्या (Jamia Millia Islamia University ) जामीया मिलीया विद्यापीठातल्या (AMU) विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागलं. दिल्लीत तीन बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठातल्या आवारात घुसून प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. त्यानंतर हा भडका जास्तच पेटला.

4. नागरिकत्व कायद्यावरुन नवी दिल्लीत तणावाचं वातावरण आहे. आंदोलकांनी बस पेटवल्यानं अनेक जण जखमी, खासगी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य भारतातही मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं करण्यात आली होती.

5. देशभर जो असंतोष आहे त्यामागे कोण आहे हे माहित आहे. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी काँग्रेसनेच चिथावणी दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. झारखंडमधल्या दुमका इथं एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. जे लोक आग लावत आहेत त्यांच्या कपड्यांवरूनच ते कोण आहेत हे कळून येतं जास्त सांगायची गरज नाही असा प्रहारच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

6. कांदा, इंधनापाठोपाठ दुधानंही आता सर्वसामान्यांचं तोंड पोळणार, आजपासून लिटरमागे 2 रुपयांची वाढ अमूलकडून रविवारी दुधात वाढ करण्यात आली असून इतर दूध कंपन्या आजपासून दरवाढ लागू करणार आहेत

वाचा-Airtel, Vodafone-Idea नंबर सुरू ठेवण्यासाठी 'हा' रिचार्ज करावाच लागणार

7. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार आजपासून 24 तास NEFTच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भातील नवा नियम आरबीआयकडून 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून होणार असल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

8. Sim Card बद्दल ट्रायचे नवे नियम आजपासून लागू होणार आहेत. TRAI याबाबत सध्या विचार करत असून कॉल आणि डेटासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. टेलिकॉम कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स, स्वस्त कॉल आणि इंटरनेट सुविधा आणि फ्री कॉलिंगची सुविधा लवकरच बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.

9. झारखंड विधानसभेचा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. सत्ताधारी भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची आज परीक्षा. भाजपच्या हातातून हे राज्य जाणार की राहणार याकडे सर्वांचं लक्ष.

10. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर 8 गडी राखून विजय. हेटमायर आणि होपची शतकी खेळी

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

First published: December 16, 2019, 7:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading