गृहखातं शिवसेनेकडे तर अर्थ राष्ट्रवादीकडे, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

गृहखातं शिवसेनेकडे तर अर्थ राष्ट्रवादीकडे, यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: राज्य आणि देशभरातील आजच्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा

1. 15 दिवसांनंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. गृहखातं शिवसेनेकडे, अर्थखातं राष्ट्रवादीकडे तर महसूल काँग्रेसच्या वाटेला आलं आहे. खातेवाटपानंतर मंत्री आज पदभार स्वीकारणार आहेत. गृह, नगरविकास, उद्योग, उच्च तंत्र शिक्षण ही वजनदार खाती सेनेकडे तर  ग्रामविकास, जलसंपदा, अर्थ ही खाती राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहेत. तर कॉंग्रेसकडे महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे.

2. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

3. पक्ष सोडण्याच्या चर्चांना नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. माझ्या वडिलांचा पक्ष आहे मी कशाला सोडू. 27 जानेवारीपासून राज्यभरात मशाल यात्रा काढणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

वाचा-आता पासपोर्टवर दिसणार ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले कारण

4. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आगामी रणनिती ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. तर मनसेच्या विभाग अध्यक्षांची रायगडमध्ये 12 वाजता बैठक होणार आहे.

5. संसदेच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज कोणत्या विधेयकावर चर्चा होणार आहे.

6. माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल. जयंत पाटील यांचं सुचक ट्वीट

7. हैदराबाद एन्काऊंन्टर प्रकरणी तेलंगणा हायकोर्टात आजपासून सुनावणी होणार. तर निर्भया प्रकरणातील आरोपींना 16 तारखेला फाशी दिली जाण्याची शक्यता.

8. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री उशिरा स्वाक्षरी केली. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं आहे. दरम्यान या विधेयकाविरोधात ईशान्य भारतात हिंसक आंदोलनं सुरू असल्यानं कर्फ्यू लावण्यात आला आहे.

9. दिग्गज फुटबॉल खेळाडू बायचुंग भुतियानं निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. हामरो सिक्किम पक्षाचा संस्थापक आणि अध्यक्ष बायचुंग भुतियानं, ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक हे लोकाच्या भावनांच्या विरोधात आहे’, असे मत व्यक्त केले.

10. महागाईने गाठला तीन वर्षांतला उच्चांक.  नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.54 टक्यांवर.

सर्वसामान्यांवर महागाईची संक्रात.

वाचा-बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी घेतो फिटनेसची काळजी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 08:40 AM IST

ताज्या बातम्या