Home /News /maharashtra /

राजकारणापासून आर्थिक व्यवहारापर्यंत आजच्या टॉप 5 बातम्या

राजकारणापासून आर्थिक व्यवहारापर्यंत आजच्या टॉप 5 बातम्या

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

    मुंबई, 07 जानेवारी: राज्यासह देशभरातील टॉप 5 महत्त्वाच्या घडामोडी. JNU हिंसाचार प्रकरणी निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर विरोध निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनांना आता वेगळं वळणं मिळालं आहे. मुंबईतले विद्यार्थी या ठिकाणी निदर्शने करत असून बॉलिवूडचे अनेक अभिनेते या स्थळी दाखल झाले आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी या विरोध प्रदर्शनांमध्ये FREE KASHMIRचे पोस्टरचे पोस्टर्स झळकविल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सविस्तर बातमी वाचा-VIDEO : JNU हिंसाचार: मुंबईतल्या निदर्शनांमध्ये झळकले FREE KASHMIRचे पोस्टर लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेना अनेक मुद्यांना थंडबस्त्यात ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं. ते केव्हा अयोध्येत जातील हे दोन दिवसांमध्ये जाहीर करू असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. सविस्तर बातमी वाचा-दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत राजधानी दिल्ली काबीज करण्यासाठी राजकीय युद्ध लवकरच सुरू होणार आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार  6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचा-Delhi Election : केजरीवाल टिकणार की अमित शहा दिल्लीचं तख्त ताब्यात घेणार? पुण्यात सुरू असलेल्या 63व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आजचा दिवस हा उत्कंठा वाढविणारा होता. प्रत्येक क्षणाला काय होईल याची कमालीची उत्सुकता होती. ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सामना बरोबरीत सुटला. पण शेवटचा गुण शैलेश शेळकेनं मिळवल्याने तो विजेता ठरला. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होणार असून त्यात महाराष्ट्र केसरी निवडला जाणार आहे. सविस्तर बातमी वाचा-'महाराष्ट्र केसरी' : अभिजित कटके स्पर्धेबाहेर, तर शैलेश शेळके अंतिम फेरीत अमेरिका आणि इराण दरम्यानचा दणाव वाढल्यामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीच्या भयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी आली. सोन्याच्या भावाने (Gold Price 6 January 2020) सोमवारी जोरदार उसळी घेतली आणि दहा ग्रॅममागे 720 रुपयांनी भाव चढला. सविस्तर बातमी वाचा- सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यादाच सोन्याने गाठली एवढी उंची
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ajit pawar, Gold rate, Maharashtra, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या