राज्यासह देशभरातील आजच्या 10 ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

राज्यासह देशभरातील आजच्या 10 ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

क्रीडा, मनोरंजननासह राज्य आणि देशविदेशातील आजच्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र खातेवाटपाचा पेच अद्यापही कायम आहे. त्यासोबतच मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. आज खातेवाटप होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

1.खातेवाटपाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. आज खातेवाटप होईल अशी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि खातेवाटपाचा पेच आज तरी सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2.नाराज एकनाथ खडसे शिवसेनेचा संपर्कात आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. तर एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार का? काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

3.आदित्य ठाकरेंना पर्यावरण तर सुभाष देसाईंना कृषी खातं मिळण्याची शक्यता. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून खातेवाटपाचे संकेत.

4.सगळ्याच पक्षांना महत्त्वाची खाती हवी आहेत. ही मलाईदार खाती मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात शिवसेनेचे तब्बल 12 पेक्षा जास्त आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक केसरकर यांच्यासारख्या अनेक दिग्गज आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. तर अनेक ज्येष्ठ आमदारही नाराज आहेत. ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत.

5.नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष

हेही वाचा- गांजा, दारू घेऊन पेब किल्यावर करत होते पार्टी, शिवभक्तांनी तळीरामांना धुतले

6.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी उरलेल्या पैशांचं वाटप करण्याबाबत घोषणा करणार आहेत.

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारीला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पोंगल, लोहड़ी, ओणम आणि इतर सणांमुळे पुढे गेल्याचं सांगितलं आहे. हा कार्यक्रम 16 जानेवारीला होणार होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला असून 20 जानेवारीला होणार आहे.

8.'इस्रो'च्या चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती इस्रोप्रमुख के सिवन यांनी सांगितलं आहे. चांद्रयान 2 मध्ये चांगलं काम सुरू आहे. विक्रम लँडरला जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहील असंही त्यांनी सांगितलं. चांद्रयान मोहिमेसाठी तयारी सुरू करण्यात आल्याचंही के सिवन यांनी सांगितले. ते म्हणाले की, दुसऱ्या स्पेस पोर्टसाठी जमीन संपादित करण्यात आली असून थूटुकुडी इथं उभारणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

9.नव्या वर्षात सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ होणार आहे. सलग चौथ्या महिन्यात गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामन्यांना मोठा दणका बसला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये विना अनुदानित गॅसच्या किंमतीत 19 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

10. मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा अनुभव. मुंबईत आठवडाभर थंडीचा मुक्काम. मुंबई परिसरात तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली

वाचा-आंदोलक ते मंत्री, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बच्चू कडूंचा प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 07:34 AM IST

ताज्या बातम्या