Home /News /maharashtra /

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या 10 ठळक घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या 10 ठळक घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

    मुंबई, 01 डिसेंबर: राज्यासह देशविदेशातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. 1. 2019ला अलविदा करत 2020 वर्षाचं जल्लोषात स्वागत. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेट वे ऑफ इंडियाचा परिसर नेत्रदीपक रोषणाईनं उजळला. नव वर्षाचं फटाक्यांच्या आतषबाजीनं स्वागत. 2. नविन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने. सिध्दीविनायक, शिर्डी साईमंदिर आणि दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी. 3. आज शौर्यदिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमामध्ये भीमसागर उसळलाय. भीमबांधव मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले आहेत. आजच्याच दिवशी 202 वर्षांपुर्वी महार बटालीयनच्या मदतीने ब्रिटीशांनी पेशव्यांचा पराभव केला होता. त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भीमसैनिक भीमा कोरेगावमध्ये येत असतात. . कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर. 4. नव्या वर्षात रेल्वे प्रवास झाला महाग, रेल्वेच्या भाड्यात 1 पैसे ते 4 पैसे प्रतिकिलोमीटरची वाढ झालीय. पॅसेंजर आणि फ्रेट अशा दोन्ही भाड्यांमध्ये बदल करण्याची ही योजना आहे पण आता फ्रेटसाठीचं भाडं आधीच जास्त असल्याने यामध्ये वाढ होणार नाही. पण पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात वाढ होईल. मुंबईकरांना भुर्दंड नाही. 5. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार तुम्हाला जर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजेच या 12 तासांत केव्हाही पैसे एटीएमद्वारे काढायचे असतील तर तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पासवर्ड येईल. हा पासवर्ड तुम्ही एकदाच वापरू शकता. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुमच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढणाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 6. नव्या वर्षात भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त दरात होमलोन देणार आहे. या बँकेचं होमलोन 31 डिसेंबर 2019 पर्यंत घेतंल तर 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. 7. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याने भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. इतकंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भवनातील सर्व खुर्च्या आणि वस्तू कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. 8. उद्धव ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र या विस्ताराविरोधात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीतली नाराजी उघड झाली होती. काँग्रेसमध्येही कुरबूर सुरू आहे. आता शिवसेनेतही नाराजीचे सूर उमटू लागले असून अंतर्गत वाद उफाळून आलाय. या नव्या वर्षात सगळ्याच नव्या मंत्र्यांना उत्सुकता आहे ती खातेवाटपाची. आपल्याला चांगलं खातं मिळावं म्हणून सगळ्याचं पक्षांचे मंत्री लॉबिंग करत असून खाते वाटपातही अनेकांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे. 9. गिरीश बापट यांनी काँग्रेसवर टीका करत संग्राम थोपटे यांना ऑफर दिली आहे. संग्राम थोपटेंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. पक्षांतर्गत कोणाला संधी द्यायची हा पक्षनेतृत्वाचा निर्णय असतो. पण अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे मध्यंतरी राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाने ही त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. हाच प्रयोग आता संग्राम थोपटे यांच्याबाबतीत होत आहे, अशी टीका बापट यांनी केली. 10. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहे. त्यामुळेच शहरातील युवक प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच युवक आणि विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांसह पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या