सत्तास्थापनेच्या नाट्याचा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच, यासोबत 8 महत्त्वाच्या घडामोडी

सत्तास्थापनेच्या नाट्याचा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच, यासोबत 8 महत्त्वाच्या घडामोडी

सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम, कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर: राज्यातल्या सत्तास्थापनेच्या नाट्याचा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यानं शिवसेनेचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.यासगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींवर एक नजर.

1. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार असं वाटत असतानाच शिवसेना नेते राज्यपालांना भेटायला गेले. पण राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र आलंच नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेतील पेच 16 दिवसांनंतरही कायम आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीर राज्यात पुन्हा एकदा बैठकांचं सत्र असणार आहे.

2. राज्यपालांनी शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं. सत्तास्थापनेची इच्छा आणि शक्यता असेल तर 24 तासांचा अवधी कळवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. आज रात्री 8.30 वाजेपर्यंत आघाडीकडे मुदत आहे.

3. शिवसेनेला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडल्याची चर्चा आहे. सेनेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपची नवी खेळी. अरविंद सावंत यांचा राजीनामा नारायण राणेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंच्या वर्णीची चिन्हं असल्याची चर्चा आहे.

4. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर भाजपची तीक्ष्ण नजर आहे. त्यामुळे पक्ष सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

5. काँग्रेस एनसीपीला पाठींबा देणार की नाही यावर काँग्रेसची सोनियांच्या निवासस्थानी आज सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेनं राज्यपालांकडे वेळ मागितलंय. राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. जयपूर-दिल्लीहून परतलेल्या काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.

6.सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी शिवसेनेला दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. राष्ट्रवादीला 24 तासांची मुदत देण्यात आली. परंतु, जर कुणाकडेच जर बहुमत नसेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

7.दिल्लीहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आज दिल्लाहून मुंबईत येणार आहेत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

8.भाजपच्या वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, शिवसेनेचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. शिवसेनेच्या खासदारांना फोडून सरकार बनवणार, अशी शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही.

9. संजय राऊत यांच्यावर सोमवारी लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रकीया यशस्वी झाल्याची माहिती मिळत आहे.

रेल्वे आणि लोकलची समोरासमोर धडक, प्रवाशांनी मारल्या उड्या LIVE VIDEO

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2019, 7:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading