सत्ता स्थापनेसाठी पुन्हा नव्यानं जुळवाजुळव, 'या' आहेत आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी

सत्ता स्थापनेसाठी पुन्हा नव्यानं जुळवाजुळव, 'या' आहेत आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर दुसरीकडे राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याच्या निर्णयाच्या शिवसेनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्यानं अखेर मंगळवारी संध्याकाळपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात आतापर्यंत लागू झालेली ही तिसरी राष्ट्रपती राजवट आहे. 1980, 2014 नंतर आता 2019मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

1. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेळ वाढून दिली नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मंगळवारी रात्री 8.30 पर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र कोणत्याच पक्षाची बहुमतासाठी समीकरणं जुळत नसल्यानं प्रत्येक पक्ष वाढीव मुदत मागत होता. मात्र राज्यपालांनी ही मुदत न देता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आणि मंगळवारी संध्याकाळी शिफारस मंजूर करण्यात आली.

2. महाराष्ट्रातील सत्तेचा पेच आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदत वाढवून न दिल्याने शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेना आमदार अनिल परब यांनी ही याचिका दाखल केली. राज्यपालांनी आम्हाला 3 दिवसांची मुदत वाढ न दिल्याने ही याचिका दाखल केल्याचं सेनेनं सांगितलं.

3. राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याच्या निर्णयाच्या शिवसेनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे सेनेच्या याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4. युती तुटली का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडून बगल देण्यात आली आहे. भाजपसोबत जाणार का? किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर कोणतीही माहिती देण्यास उद्धव ठाकरेंनी घाई नाही. थोड्या वेळ थांबा अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असं ठामपणे सांगताना उद्धव म्हणाले की, भाजपकडूनही माझ्याशी संपर्क होत आहे. याचा अर्थ युतीचं मनोमीलन होणार का याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे.तिन्ही पक्ष माझ्या संपर्कात आहेत, असंही उद्धव म्हणाल्याचं समजतं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे.

देशातल्या 'या' राज्यांमध्ये आहेत 1-2 नाही तर 5 उपमुख्यमंत्री!

5. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वापूर्ण बैठक होणार आहे.

6. राष्ट्रपती राजवटीनंतर क्यार वादळ, आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का आणि कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तातडीनं मदत मिळावी यासाठी शेतकरी मात्र वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहेत.

7.'सत्तास्थापनेचा गुंता न सुटल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट दुर्दैवी' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 'हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे'. अशी टीका राज ठाकरेंनी केली.

8. 'भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. राज्यपालांकडे 145 आमदारांच्या पत्रासह जाऊ, शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल असं वाटत नाही'असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.सध्या भाजप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्यानं भाजपच्या निर्णयाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

9. शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस- राष्ट्रवादीचा अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दोन्ही पक्ष एकमेकांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं सेनेला सांगितलं जात आहे. 'आपाआपसात पुन्हा चर्चा करून पुढील निर्णय घेणार. आता तर राज्यपालांनी चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ दिला.' असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.

10.राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजप प्रयत्न करणार, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नारायण राणेंनी वक्तव्य केलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

सेनेसोबत सरकार स्थापन करणार? पवारांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 07:32 AM IST

ताज्या बातम्या