राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीन वाढला; सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीन वाढला; सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र

सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग. मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचं साधारण चित्र पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे. तर मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचं साधारण चित्र पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

एनसीपी कोअर कमिटीची सकाळी 10.30 बैठक बोलवण्यात आली आहे. शरद पवार यांनी ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलवली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचावर बैठकीत चर्चा होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या बैठकीत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस कार्यसमितिची सकाळी 10.00 वाजता बैठक बोलवण्यात आली आहे.काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती बाळासाहेब थोरात यांनी फोनवरुन दिली पटेलांना दिली आहे. काँग्रेसच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर ती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता आणखीन वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं.

सत्तास्थापनेचा दावा भाजपनं फेटाळल्यानंतर आज सकाळी 11 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

शिवसेनेनं जनादेशाचा अनादर केलाय त्यामुळे भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही अशी निर्णायक भूमिका भाजपनं रविवारी संध्याकाळी जाहीर केली. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटीलांसह कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यापालांची भेट घेत भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाच्या शिवसेनेला शुभेच्छा आहेत, अशा खोचक शुभेच्छाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिल्या.

संजय राऊत यांची आज भांडूपमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पवार आणि राऊत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. ह्याबाबत पत्रकार परिषदेत संजय राऊत काही बोलणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपनं सत्तास्थापनेच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. सत्ता स्थापनेसाठी बहुमत सध्या नसल्यानं संजय राऊत राज्यपालांना मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षावर आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची चिन्हं आहेत. जनतेनं शिवसेना-भाजपला बहुमत दिलं आहे त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं. असा सल्ला दिला होता. तर आघाडी विरोधी पक्ष म्हणून विधीमंडळात बसेल अशी भूमिका पवारांनी घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेकडे सर्वांचं लक्ष आहे.

जयपूरला महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. आमदार फोडाफोडीचं राजकारण होऊ नये यासाठी त्यांना जयपूरमध्ये पाठवण्यात आलं होतं. मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षावर दिल्लीत वेगानं घडामोडी सुरू आहे.

SPCIAL REPORT: अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; 2 हजार हेक्टरवरील पिकं भुईसपाट

Published by: Kranti Kanetkar
First published: November 11, 2019, 7:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading