मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

मुंबई ते दिल्लीसह महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

मुंबई ते दिल्लीसह महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

मुंबई ते दिल्लीसह महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 18 नोव्हेंबर: मुंबई ते दिल्लीसह महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. 1. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असली तरी सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्य़ाबाबात त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे शिवसेना कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. 2. देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे आज शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले. बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल. सरन्यायाधीश पदावरून 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील. 3. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 43 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार आहे. एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. वादग्रस्त नागरिकत्व कायदा पटलावर आणण्याचा मोदींचा अजेंडा या अधिवेशनात असेल. 4. अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयविरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. पर्यायी जमीन न स्वीकारण्याबाबत बोर्डाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात रविवारी ऊस दरासाठीची पार पडलेली साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. तर कोल्हापुरातील साखर कारखाने आज बंद राहणार आहेत. 5. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेने NDAमधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरूच असून त्यातून अजुनतरी काहीही ठोस निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळेही आता शिवसेनेच्या चिंतेत वाढ झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 6. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. मात्र यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस हे स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून निघून गेले. 7. भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा जंयत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आणि कही भाजपचे आमदार संपर्कात असल्याचं पाटील यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सांगितलं. 8.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची आज सकाळी 11. 30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शेतकऱ्यांसाठी मदत निधी, राज्यातील सत्ता संघर्ष आणि सध्या सुरू असलेल्या ऊस शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील बैठकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 9. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम म्हणजेच एलआयसीची पॉलिसी तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी 30 नोव्हेंबरपासून 24 हून अधिक पॉलिसी बंद करणार आहे. इन्श्यूरन्स रेग्युलेटरी IRDA च्या लाइफ इन्श्यूरन्स प्रॉडक्ट च्या नव्या नियमावलीनुसार एलआयसी जुन्या पॉलिसी बंद करणार आहे. जुन्या पॉलिसी असलेल्यांच्या पॉलिसी किंवा त्यांच्या पॉलिसी किंवा त्यातून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. 10. दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेल या कंपनीचे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर तुमचं सिम अपडेट केलं नसेल किंवा तुमचं सिमकार्ड जुनं असेल आणि तुम्ही ते बदलून घेतलं नसेल तर तुमचं इंटरनेट बंद होऊ शकतं.
First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadanvis, Election 2019, Maharashtra, Parliament session, PM narendra modi, Sanjay raut, Soniya gandhi, Suprim court

पुढील बातम्या