मुंबई ते दिल्ली 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

मुंबई ते दिल्ली 'या' आहेत आजच्या 10 ठळक घडामोडी

राज्यातील आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण गरम आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही सत्ता स्थापनेसाठी वेगानं गाठीभेटी, बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मात्र अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं समीकरण न जुळल्यानं पुन्हा एकदा नव्यानं सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी थोडक्यात

1. राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. तर भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असंही फडणवीस म्हणालेत. मुंबईच्या दादर भागात भाजपच्या सर्व आमदारांची बैठक गुरुवारी पार पडली. त्यामध्ये फडणवीसांनी हे विधान केलं. तर आज भाजप पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे.

2. उद्याही या बैठकांचे सत्र सुरू असणार असून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक उद्या होणार आहे. काल झालेल्या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा भाजपसरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत आमदारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केला होता. येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार असून त्याविषयी आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

3.पुढच्या 2-3 दिवसात महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती संदर्भात सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार आहे. त्यावेळी किमान कार्यक्रमाच्या मसुद्यावर निर्णय होणार अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. आघाडीमध्ये चर्चा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तरीही येत्या 2 ते 3 दिवसांत पवार आणि सोनिया गांधी चर्चा करणार आहेत.

4.महाशिवआघाडीमध्ये काँग्रेसनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केलेली नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी जाहीर केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक काल संध्याकाळी पार पडली. या बैठकीत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, विजय वेडाटीवर हे नेते उपस्थित होते. किमान समान कार्यक्रम आणि सत्तेत सहभाग या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

5.सत्तास्थानपेच्या धामधुमतही शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत. शरद पवार 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. पवारांनी काटोल जिल्ह्यातील पावसानं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. काटोल तालुक्यातील चार गावातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी करण्यात आली.

मुंबई महापौर निवडणुकीच्या तोंडावर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Income Tax चे छापे

6. उद्धव ठाकरे आज सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनंतर आज उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

सत्तास्थापनेच्या तिढ्यात नव्या राजकीय गरमागरमीची भर,

7.मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांवर इन्कम टॅक्सची धाड, शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

8. राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मोदी सरकारला मोठा दिलासा, राफेलविरोधी सर्व याचिका निकाली, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी

9. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हरत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना जोरादार उधाण आलं आहे.

10. केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांचा आज पुण्यात दौरा आहे. गडकरींच्या हस्ते उड्डाण पुलाचं भूमीपूजन आज करण्यात येणार आहे.

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

First published: November 15, 2019, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading