'या' बँकेतील खातेधारकांना 6 महिन्यांसाठी काढता येणार फक्त 1000 रुपये

'या' बँकेतील खातेधारकांना 6 महिन्यांसाठी काढता येणार फक्त 1000 रुपये

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यानं प्रचंड गोंधळ उडाला आहे. सोमवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यानं प्रचंड गोंधळ उडाला आहे. सोमवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहुन ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं आरबीआयनं आदेशात नमूद केलं.

पीएमसी बँकेच्या समोर ही अशी गर्दी झाली. संतापलेल्या ग्राहकांनी दगडफेक करून काचाही फोडल्या. बँकेच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. पीएमसीच्या मुंबई आणि नवी मुंबईतल्या सर्वच शाखांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आरबीआयनं निर्बंध लादल्याचं समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. बँकिंग नियमन कायदा '35 अ' अंतर्गत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणं, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध आलेत. तसंच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेनं कोणतीही गुंतवणूक करू नये, नव्या ठेवी स्वीकारू नयेत,  बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत असे निर्बंध बँकेवर टाकण्यात आलेत.

महिन्यांसाठी निर्बंध टाकलेत.  त्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. या निर्बंधांची माहिती बँकेनं प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं. बँकेची सद्यस्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होतं, असं रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटलंय. मात्र आता ही सर्व परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 25, 2019, 9:42 AM IST
Tags: PMC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading