जिल्हा बँकांमधील जुन्या नोटा अखेर RBI स्विकारणार !

जिल्हा बँकांमधील जुन्या नोटा अखेर RBI स्विकारणार !

जवळपास 2721 कोटींच्या नोटा आरबीआय स्वीकारणार आहे.

  • Share this:

21 जून : जिल्हा बँकांना अखेर दिलासा मिळालाय. कारण जिल्हा बँकांकडच्या जुन्या नोटा आता आरबीआय स्विकारणार आहे. 30 दिवसांच्या आत म्हणजे 20 जुलैपर्यंत या नोटा आरबीआयकडे जमा करता येणार आहेत.

जवळपास 2721 कोटींच्या नोटा स्विकारल्या जाणार आहेत. जुन्या  500 आणि 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलाये.

पोस्ट कार्यालयांनाही जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर 2015 ला ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्यानंतर नागरिकांनी बँका, टपाल कार्यालये आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या होत्या.

कुठल्या बँकेत किती आहेत नोटा?

महाराष्ट्र राज्यात एकूण 32 जिल्हा बँक आहेत

- या बँकांमध्ये 5228 कोटीच्या जुन्या नोटा पडून

  • पुणे जिल्हा बँक-  811 कोटी
  • सातारा जिल्हा बँक - 399 कोटी
  • नाशिक बँक -  376 कोटी
  • चंद्रपूर बँक - 356 कोटी

जुन्या  500 आणि 1000 च्या नोटा  RBI कडे जमा करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलाये. पोस्ट कार्यालयांनाही जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर नागरिकांनी बँका, टपाल कार्यालये आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या होत्या.

First published: June 21, 2017, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading